मुंबई- नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या हनिमूनचे रोमँटिक क्षण शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नवविवाहित जोडपे खूप मस्ती करताना दिसत आहे आणि दुबई येथील सुंदर दृष्येही या फोटोंमध्ये कैद झाली आहेत. दोघांच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा - पाहा, काजल अग्रवालच्या हनीमूनचे पतीसोबत समुद्रातील रोमँटिक फोटो
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्या फोटोवर त्यांच्या कुटुंबियांनीही सुंदर कॉमेंट्स केल्या आहेत. नेहाची बहिण सोनू कक्कर आणि भाऊ टोनी यांनीही नवविवाहित जोडप्यांचे कौतुक केले आहे. चाहत्यांनीही फोटोंवर भरपूर प्रेम व्यक्त केलंय.
हेही वाचा - ''मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन'' : महेश टिळेकरांची अमृता फडणवीसांच्या गायनावर जोरदार टीका
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचे २४ऑक्टोबरला दिल्लीत लग्न झाले होते. लग्नानंतर हे दोघेही हनिमूनसाठी दुबईला गेले होते. त्यांच्या हनिमूनचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.