महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जयललितांच्या भूमिकेसाठी हॉलिवूडचा ऑस्कर विजेता मेकअप आर्टिस्ट करणार कंगनाच्या लूकवर काम - jaylalitha biopic news

चित्रपटाचे निर्माता विष्णू इंदूरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. जयललिता यांच्यासारखा लूक साकारण्यासाठी हॉलिवूडच्या ऑस्कर विजेता मेकअप आर्टिस्ट जेसन कॉलिन्स यांची निवड करण्यात आली आहे. ते सध्या कंगनाच्या लूकवर काम करत आहेत.

ऑस्कर विजेता मेकअप आर्टिस्ट करणार कंगनाच्या लूकवर काम

By

Published : Sep 14, 2019, 9:45 PM IST

मुंबई - अभिनेत्री कंगना रनौत ही जयललिता यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. या बायोपिकसाठी कंगनाच्या लूकवर बरीच मेहनत घेण्यात येणार आहे. अगदी तमिळ भाषा शिकण्यापासून ते भरतनाट्यमचे धडे घेण्यापर्यंत, कंगना प्रत्येक गोष्ट समरसून करत आहे. जयललिता यांच्यासारखा लूक साकारण्यासाठी हॉलिवूडच्या ऑस्कर विजेता मेकअप आर्टिस्ट जेसन कॉलिन्स यांची निवड करण्यात आली आहे. ते सध्या कंगनाच्या लूकवर काम करत आहेत.

चित्रपटाचे निर्माता विष्णू इंदूरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. जेसन कॉलिन्स (Jason Collins) यांनी यापूर्वी 'कॅप्टन मार्व्हल' चित्रपटाच्या कलाकारांच्या लूकवर काम केले आहे.

हेही वाचा-अॅक्शन टिझर : पाहा, श्वास रोखून धरणारी दृष्ये आणि जीव धोक्यात घालणारा पाठलाग

कंगना या चित्रपटात चार वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. कंगनाची भुमिका अधिक प्रभावी व्हावी, यासाठी आम्ही हॉलिवूड मेकअप आर्टिस्ट यांना बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा आशयाचे एक ट्विट विष्णू इंदूरी यांनी केलं आहे.

याशिवाय कंगनाची बहीण रंगोली हिने सुद्धा आपल्या ट्विटर वरून या माहितीला दुजोरा दिला आहे. सोबतच १९ सप्टेंबर रोजी कंगना या लूक टेस्ट साठी लॉसएंजलिस येथे जाणार असल्याचे सुद्धा रंगोलीने सांगितले आहे. तसेच या सिनेमात एक कर्तृत्वान महान महिला दुसऱ्या महान महिलेचे पात्र साकारणार आहे त्यामुळे याचा अंतिम लूक हा नक्कीच तुम्हाला आश्चर्यचकित करणारा असेल, असेही तिने सांगितले आहे.

हेही वाचा-अभिनेत्री कियारा अडवाणीने मारली अशी किक, व्हिडिओ पाहून व्हाल चकित

जयललिता यांच्यावर आधारित बायोपिकचे तामिळमध्ये 'थलैवी' तर हिंदीत 'जया' हे शिर्षक असणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details