महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत होळीच्या धूळवडीत रंगणार यश आणि नेहामधील प्रेम! - मालिकेत होळीची धूळवड

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये सणवार मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. आता रंगांचा सण होळी येऊ घातलाय आणि या मालिकेत गुलाबी रंगाची होळी साजरी होणार आहे.

माझी तुझी रेशीमगाठ
माझी तुझी रेशीमगाठ

By

Published : Mar 17, 2022, 1:55 PM IST

मालिकांमध्ये सणवार मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. आता रंगांचा सण होळी येऊ घातलाय आणि जवळपास सर्वच मालिकांमधून त्याचे ‘रंग’ बघायला मिळतात. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी आणि परीचा निरागस अभिनय या गोष्टींमुळे मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेतील अनेक रंजक वळणं प्रेक्षकांना खिळवून ठेवतात आणि ही मालिका नुकतीच एका विलक्षण वळणावर आली आहे. नुकतंच प्रेक्षकांनी या मालिकेत पाहिलं की यश आणि नेहा एकमेकांवरील प्रेमाची कबुली देतात.

होळीचा सण जवळ आला आहे आणि या मालिकेत गुलाबी रंगाची होळी साजरी होणार आहे कारण या होळीमध्ये फुलणार आहे यश आणि नेहामधील प्रेम. नेहा, यश आणि परी एकमेकांसोबत पहिल्यांदा होळीचा सण एकत्र साजरा करणार आहेत. त्यामध्ये यश नेहाला तिचं आयुष्य रंगांनी भरून टाकणार असं कबूल करतो, त्यामुळे त्यांच्या या प्रेमकथेला धुळवडीचाही रंग चढताना प्रेक्षक पाहू शकतील.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील काही खास क्षणचित्रं पाहिल्यावर कळेलच की तेथील होळी कशी साजरी झाली.

हेही वाचा -द काश्मीर फाइल्सचे बॉक्स ऑफिसवर वादळ, ५० कोटींचा आकडा पार

ABOUT THE AUTHOR

...view details