मुंबई- अभिनेत्री हिना खानने मालदीवमधील तिच्या सुट्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हिनाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बीचवर डिनर करताना दिसत आहे. फोटोत ऑलिव्ह ग्रीन ड्रेसमध्ये बोल्ड रेड लिपस्टिक लावलेली अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे.
तिने फोटोला कॅप्शन देऊन लिहिलंय, "नाईटमोड फोटोग्राफी स्वतःच सर्वोत्कृष्ट असते. या सुंदर डिनरबद्दलही तुमचे धन्यवाद."
हेही वाचा -रकुलप्रीत सिंहने फ्लाईंग बोर्डवरील फोटो केले शेअर, चाहत्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद