महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हिमांश कोहलीने स्वतः लाच दिली स्पोर्ट्स कार गिफ्ट - हिमांशने कारसाठी निळा रंग निवडला

हिमांश कोहलीने आपल्या वाढदिवसाच्या अगोदरच स्वतःलाच कार गिफ्ट केली आहे. स्पोर्ट्स कार खरेदी करण्याचे त्याचे स्वप्न यामुळे पूर्ण झाले आहे.

Himanshu Kohli
हिमांश कोहली

By

Published : Oct 22, 2020, 4:01 PM IST

मुंबई- अभिनेता हिमांश कोहली ३ नोव्हेंबरला आपला ३१वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यानिमित्ताने त्याने नवीन कार खरेदी केली आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला, "माझा वाढदिवस येत आहे आणि २०२० सर्वांसाठीच वाईट गेले आहे. म्हणून मी स्वत: ला आनंदित करण्याचा विचार केला आणि स्वत: ला ही भेट दिली. स्पोर्ट्स कार सुरुवातीपासूनच माझ्या बकेट लिस्टमध्ये होती. अखेरीस ती मिळाली असल्याचा मला आनंद झाला आहे. "

तो म्हणाला, "दिल्लीत माझ्या घराबाहेरुन दोन एसयूव्ही चोरी झाल्या होत्या. एक २०१५मध्ये आणि एक २०१९मध्ये. दोन्ही कार खरेदीनंतर तीन ते चार महिन्यांच्या आत चोरी झाल्या होत्या. हे काही चांगल्या क्षणानंतर आलेल्या वाईट क्षणांसारखे आहे."

हिमांशने नवीन कारसाठी निळा रंग निवडला आहे. हिमांश कोहली खूप चांगला गायक आहे. त्याचे गायिका नेहा कक्करशी प्रेमसंबंध होते. दोघांचा ब्रेकअपही चर्चेचा विषय ठरला होता.

नेहा कक्करने हिमांशवर अनेक आरोप ठेवले होते. ती नॅशनल टीव्हीवर रडली होती. सोशल मीडियावरही तिने अनेक पोस्ट्स पोस्ट लिहिल्या होत्या. यावर हिमांशनेही आपले स्पष्टीकरण दिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details