महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ला लोकप्रिय मालिकांच्या नायिकांची भेट! - बीजमाता राहीबाई पोपेरे

प्रत्येक आठवड्यात लिटिल चॅम्प्स आपल्या भन्नाट परफॉर्मन्सने सगळ्यांना थक्क करतात. यातील काही स्पर्धकांनी या मंचाला निरोपही दिला. या आठवड्यात सर्व स्पर्धकांनी देवीला समर्पित करणारी गाणी सादर केली. या कार्यक्रमात झी मराठीवरील मालिकांमधील प्रमुख नायिकांसोबत लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल आणि बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी हजेरी लावली होती.

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स

By

Published : Oct 16, 2021, 10:09 PM IST

प्रत्येक रियालिटी शोमध्ये लोकप्रिय कलाकारांना निमंत्रित केले जाते आणि ते प्रेक्षकांनाही आवडत असते. झी मराठी वाहिनीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्स हा तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा आणि संगीत प्रेमींचा अगदी लाडका कार्यक्रम आहे. त्यातील सर्व निरागस स्पर्धकांइतकाच गोड त्यांचा परफॉर्मन्स असतो. फक्त परीक्षक आणि प्रेक्षकच नाही तर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार देखील या छोट्या गायकांचे फॅन झाले आहेत. नुकतीच नवरात्र येऊन गेली आणि दसरा सुद्धा जोशात साजरा केला गेला. या सणांचे सेलिब्रेशन करण्यासाठी सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमात झी मराठीवरील मालिकांमधील प्रमुख नायिकांसोबत लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल आणि बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी हजेरी लावली होती.

प्रत्येक आठवड्यात लिटिल चॅम्प्स आपल्या भन्नाट परफॉर्मन्सने सगळ्यांना थक्क करतात. यातील काही स्पर्धकांनी या मंचाला निरोपही दिला. या आठवड्यात सर्व स्पर्धकांनी देवीला समर्पित करणारी गाणी सादर केली. त्यांचं कौतुक करण्यासाठी मंचावर सज्ज होत्या झी मराठीच्या लाडक्या मालिकांमधील प्रमुख नायिका. प्रार्थना बेहेरे, अन्विता फलटणकर, ऋता दुर्गुळे, श्वेता राजन, कुंजिका काळविण्ट, तन्वी कुलकर्णी, वैष्णवी करमरकर या प्रेक्षकांच्या आवडत्या नायिकांसोबतच महाराष्ट्राची महानायिका अलका कुबल आणि प्रेरणादायी बीजमता राहीबाई पोपेरे देखील या विशेष भागात सहभागी झाल्या होत्या.

या सर्व नायिकांच्या उपस्थितीत सगळे लिटिल चॅम्प्स खूप धमाल करताना दिसले. त्यांच्या गाण्यांमुळे या नायिकांनी मंचावर ताल देखील धरला आणि काही गाणी त्यांच्या डोळ्यात पाणी आणून गेली. सारेगमप लिटिल चॅम्प्सचा हा कार्यक्रम झी मराठीवर प्रसारित होतो.

हेही वाचा - बालकाला जीवदान देण्यासाठी फराह खानने उभी केली 16 कोटींची मदत

ABOUT THE AUTHOR

...view details