मुंबई - माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मानुषी छिल्लर हिने पोषण विषयावर सोशल मीडिया मोहीम सुरू केली आहे. याद्वारे तिला लोकांना योग्य अन्नाचे महत्त्व सांगावेसे वाटते. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय पौष्टिक सप्ताहाबद्दल मानुषी म्हणाली, "मला वारंवार सांगितले गेले आहे की, आपण जे काही आहोत ते आपण खात असलेल्या अन्नानुरुप आहोत, म्हणून त्याबाबत जागरुक राहण्याची गरज आहे."
ती पुढे म्हणाली, "योग्य अन्न आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून योग्य पौष्टिकतेने जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा घेता येणाऱ्या सकारात्मकतेबद्दल माहिती व्हावी ही माझी इच्छा आहे."