महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'राणादा'ने ठाणे सार्वजनिक गणेशोत्सवात केली बाप्पाची आरती - हार्दिक जोशी

गणेशोत्सवा निमित्ताने घरी आलेल्या हार्दिकने ठाण्यातील रुस्तमजी अरबेनिया या सोसायटीमधील गणपती मंडळाला भेट देऊन आरतीमध्ये सहभाग घेतला. हार्दिक पुण्यातील ढोलपथकाचा सक्रिय सदस्य असल्याने वेळ मिळाला तर यंदा तो विसर्जन मिरवणुकीत ढोल वादनासाठी जाणार आहे.

हार्दिक जोशीने केली बाप्पाची आरती

By

Published : Sep 4, 2019, 4:34 PM IST

मुंबई- अवघ्या महाराष्ट्रात 'राणा दा' नावाने लोकप्रिय असलेला आणि सध्या राजा राजगोंडा म्हणून ओळखला जाणारा हार्दिक जोशी सध्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईत आला आहे. हार्दिकचे कुटुंबीय काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील रुस्तमजी अरबेनियामध्ये राहण्यासाठी आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरी आलेल्या हार्दिकने या सोसायटीमधील गणपती मंडळाला भेट देऊन आरतीमध्ये सहभाग घेतला.

हेही वाचा - पुतळ्यातली आई पाहून श्रीदेवीच्या मुली झाल्या भावूक

हार्दिक वर्षभर शूटींगमध्ये व्यग्र असला तरीही गणपतीसाठी तो आवर्जून घरी येतो. त्याच्या घरी 5 दिवस गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. हार्दिक घरी आला, की त्याचे सगळे मित्र मिळून बाप्पाची महाआरती करतात. एवढंच नाही तर हार्दिक पुण्यातील ढोलपथकाचा सक्रिय सदस्य असल्याने वेळ मिळाला तर यंदा तो विसर्जन मिरवणुकीत ढोल वादनासाठी जाणार आहे.

यंदा गणेशोत्सवावर कोल्हापूरमध्ये आलेल्या जलप्रलयाचं सावट असलं, तरीही जमेल तसा प्रयत्न करून परंपरेचं जतन करण्यासाठी यंदा गणेशोत्सव साजरा होत असल्याचे त्याने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.

हेही वाचा - साहो : 'नक्कल करायलाही अक्कल लागते'... फ्रेंच दिग्दर्शक जेरोम साल्ले यांचा टोमणा

ABOUT THE AUTHOR

...view details