मुंबई - साउथ सुपरस्टार रजनीकांत आज त्यांचा ७१वा वाढदिवस आहे. केवळ दक्षिण भारतातच नाही तर त्यांनी संपूर्ण जगभरात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. जगभरातून रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत.
ट्विटरवर देखील (HBD Superstar Rajinikanth) असे ट्रेंड होत आहे. दरवर्षी रजनीकांत यांच्या वाढदिवसाला दक्षिण भारतात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. अनेक जण अनोख्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देत असतात. आज मात्र क्रिकेटर हरभजन सिंह याच्या अनोख्या शुभेच्छांनी सर्वांचे लक्ष वेधलं आहे. हरभजनने रजनीकांत यांचा हुबेहुब टॅटू आपल्या छातीवर कोरला आहे. छातीवरील टॅटूचा फोटो शेअर हरभजनने रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.