महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

विशाल निकम साठी ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ चा सेटच बनलीय व्यायामशाळा! - star pravah

फिटनेसकडे विशेष लक्ष देणारा विशाल निकम 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेच्या सेटवरच वर्कआऊट करतो. सेटवरील वस्तुंचा वापर करून सेटलाच त्यानं जीम बनवलंय.

विशाल निकम साठी ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ चा सेटच बनलीय व्यायामशाळा!
विशाल निकम साठी ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ चा सेटच बनलीय व्यायामशाळा!

By

Published : Jan 19, 2021, 11:00 AM IST

मुंबई - ’साता जल्माच्या गाठी’ मालिकेतील युवराजच्या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळालेला विशाल निकम आता तो ज्योतिबाची ऐतिहासिक भूमिका साकारतोय. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत ज्योतिबा साकारणारा विशाल त्याच्या भूमिकेसाठी खूपच मेहनत घेतोय. साहजिकच अशा भूमिकेला साजेशी शरीरयष्टी त्याने कमावलेली आहे. विशेष म्हणजे शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढून तो वर्कआऊट करतो. त्याच्यासाठी मालिकेचा सेटच व्यायामशाळा बनली आहे.

भूमिकेला साजेशी देहयष्टी विशालने कमावली आहे

मुळचा सांगलीचा असलेला विशाल फिटनेसकडे विशेष लक्ष देतो. शूटिंगमधून जीमसाठी वेगळा वेळ काढणं शक्य होत नसल्यामुळे विशालने सेटवरच वर्कआऊट करणं सुरु केलं आहे. भूमिकेसाठी फिटनेस राखणं अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळेच विशालने हा नवा मार्ग शोधून काढला आहे. सेटवरच्या वस्तूंचा वापर करत त्याने सेटलाच जीम बनवलं आहे. विशाल शाकाहरी आहे. त्यामुळे दूध, मोड आलेली कडधान्य, ताज्या भाज्या आणि फळं अश्या सकस आहाराकडे त्याचा कल असतो. सोबतीला दररोजचा व्यायाम असल्यामुळे विशालला फिटनेस राखणं शक्य झालं आहे.

सेटवरील वस्तुंचाच विशाल व्यायामासाठी वापर करतो
फिटनेस प्रेमाविषयी सांगताना विशाल म्हणाला, ‘मी ज्योतिबाच्या भूमिकेसाठी बारा किलो वजन वाढवलं होतं. मात्र शूटिंगच्या वेळापत्रकातून हे वजन तसंच राखणं हे माझ्यासाठी नवं आव्हान आहे. दररोज जीमला जाणं शक्य नसल्यामुळे मी सेटवरच वर्कआऊट करतो. सेटवर लाईट्ससाठी वापरले जाणारे वेट्स आणि काही उपलब्ध गोष्टींचा वापर करुन मी वर्कआऊट करतो. डाएटिशनच्या सल्यानेच मी माझा आहार घेतो. सेटवर माझ्या खाण्यापिण्याचीही योग्य काळजी राखली जाते. सर्वांच्या सहकार्यामुळेच मला माझा फिटनेस राखणं शक्य होत आहे. प्रेक्षकांचा देखिल दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेला भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे हे खूप महत्वाचे असून त्यांना अपेक्षाभंग होऊ नये ही काळजी घेणे हे आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे.”
विशालने अशा प्रकारे सेटलाच जीम बनवले आहे
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ दररोज सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रसारित होते.
जीमसाठी वेळ काढणे शक्य नसल्यानं सेटवरच तो वर्कआऊट करतो

ABOUT THE AUTHOR

...view details