मुंबई - रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या ३३ दिवसांपासून सतत युद्ध सुरू आहे. रशिया युक्रेनवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीवसह अनेक शहरे उद्ध्वस्त केली आहेत. युक्रेनियन लोक आपली घरे सोडून इतर देशांमध्ये आश्रय घेत आहेत. तेथील परिस्थिती लोकांकडून पाहिली जात नाही. युक्रेनला जागतिक स्तरावर मदत करण्यासाठी प्रत्येकजण पुढे येत आहे. त्याचबरोबर युक्रेनच्या मदतीबाबत संयुक्त राष्ट्रांमध्ये धोरणे तयार केली जात आहेत. इकडे भारत युक्रेनमधील परिस्थितीवरही गंभीर आहे. त्याच बरोबर गुजरातच्या सुप्रसिद्ध लोकगीत गायिका गीता बेन रबारी यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
युक्रेनच्या मदतीसाठी गीता रबारी याचे गायन गीता बेन रबारी या एक उत्तम गायिका आहे आणि अनेकदा देशाबाहेर शोमध्ये जात असतात. अलीकडेच त्यांनी केंटकी (यूएसए), जॉर्जिया, अमेरिकेत एक कॉन्सर्ट केला. या कार्यक्रमात अनेक गुजराती अनिवासी भारतीयांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये गीता बेनने रशियाचा सामना करत असलेल्या युक्रेनच्या मदतीसाठी २.२५ कोटी रुपये जमा केले आहेत.
गीता बेनने या शोच्या काही झलक सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. या फोटोमध्ये गीता बेन परफॉर्म करत असल्याचे दिसत असून तिच्याभोवती डॉलर्स पसरलेले आहेत. शो पाहण्यासाठी अमेरिकेतील अनेक श्रीमंत उद्योजकांनी गर्दी केली होती. रबारी यांच्या गायनावर फिदा झालेल्या अनेकांनी त्यांच्यावर सढळ हस्ते डॉलर्सची उधळण केली. यातून सुमारे सव्वा दोन कोटींची रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम त्या युक्रेनच्या मदतीसाठी पाठवणार आहेत.
युक्रेनच्या मदतीसाठी गीता रबारी याचे गायन
हे फोटो शेअर करताना गीता बेनने लिहिले, 'ही काल रात्रीच्या कार्यक्रमातील काही झलक आहेत. आम्ही अमेरिकेतील अटलांटा, जॉर्जिया येथे लोक गीतांचा कार्यक्रम केला. काही आध्यात्मिक क्षण तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहोत.''गीता बेन एक गुजराती गायिका आहे. लोकगीते, भजन, संतवाणी आणि दर्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. त्या गुजरातमधील कच्छ भागातील टप्पर गावातील असून त्यांच्या पतीचे नाव पृथ्वी रबारी आहे.
हेही वाचा -लता मंगेशकर व दिलीप कुमार यांच्या नावाचा ऑस्कर सोहळ्यात विसर