मुंबई : मराठी नववर्षाचा पहिला दिवस असणारा गुढीपाढवा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. मात्र, गेल्या वर्षीपासून या सणावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे प्रत्येकजण अगदी साधेपणाने आणि घरातच राहून गुढीपाडवा साजरा करत आहे. तसेच लॉकडाऊनचेही संकेत देण्यात आले आहेत. राज्यात सध्या मिनी लॉकडाऊन सुरू आहे. यामध्ये जमावबंदीच्या कारणामुळे लोक शोभायात्रा काढू शकत नाही. एकमेकांना भेटून शुभेच्छा देऊ शकत नाही. मात्र असे असूनही लोकांनी गुढी पाडव्याचे उत्साहात आणी आनंदात स्वागत केले आहे. यात मनोरंजनसृष्टीतील कलाकारही सामील झालेत.
प्राजक्ता माळी, शिवानी बावकरने दिल्या शुभेच्छा
सुस्वरूप आणि नेहमी हसतमुख असणारी प्राजक्ता माळीने हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो. प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी बावकरने प्लॅनेट मराठीच्या वतीने नववर्षाच्या शुभेच्छा देताना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.