मुंबई -सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील 'कुछ रंग प्यार के ऐसे भी- नयी कहानी' ही एक लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर दिसेल. प्रासंगिक पात्र, भावनिक कथा आणि देव व सोनाक्षी ऊर्फ देवाक्षीमधील (#Devakshi) केमेस्ट्री ही प्रेक्षकांसाठी नेहमीच दृदयस्पर्शी ठरली आहे. 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', मधील पुढील भागात प्रेक्षक सुप्रिया पिळगावकर ऊर्फ ईश्वरी, तिच्या नातवांसोबतचे प्रेम दर्शवताना दिसेल.
मुलाच्या जीवनातील आजी-आजोबांचे महत्त्व मोठे आहे. “आजी-आजोबा आणि नातवंडांमध्ये वयाचे खूप अंतर असूनही ते परस्परांशी जोडले जातात. एवढेच नव्हे तर आपले ज्ञान वेगळ्याच प्रकारे ते परस्परांना शेअर करतात. आजी-आजोबा नातवांना कशा प्रकारे नातवांना सांभाळतात, त्यांच्या मागण्या पूर्ण करतात हे मी खूप वेळा पाहिले आहे. हे सकारात्मक पालकत्त्वाचे स्वरुप आहे. मुलांना काय हवे आहे, हे समजण्यासाठी ते खूप काही ऐकतात आणि नंतर ते अंमलात आणतात. त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो तसेच न घाबरता एखादी नवी गोष्ट ते करू शकतात. माझ्या स्वत:च्या कुटुंबातही मी हे पाहिले आहे.”