मुंबई - बॉलिवूडचे 'विलन' म्हणून वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अमरीश पुरी यांचा आज जन्मदिवस आहे. अमरीश पुरी जेव्हाही पडद्यावर विलन म्हणून यायचे तेव्हा प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नव्हता. त्यांचा भारदस्त आवाज, डोळ्यातून निघणारा त्यांचा राग आणि त्यासोबतच त्यांचा दमदार अभिनय प्रेक्षकांना सिनेमागृहात खिळवून ठेवण्यास भाग पडत होता. त्यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलनेही खास डुडल करुन त्यांना अभिवादन केले आहे.
'मोगँबो खुष हुआ', अमरीश पुरी यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलचं खास डुडल
अमरीश पुरी यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी पाकिस्तानच्या लाहोर येथे झाला होता. त्यांनी त्यांच्या अभिनयाने चित्रपटसृष्टी नाही तर, रंगभूमी देखील गाजवली. सत्यदेव दुबे, गिरीष कर्नाड यांच्यासोबत त्यांनी अनेक नाटकात भूमिका साकारल्या आहेत.
अमरीश पुरी यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी पाकिस्तानच्या लाहोर येथे झाला होता. त्यांनी त्यांच्या अभिनयाने चित्रपटसृष्टी नाही तर, रंगभूमी देखील गाजवली. सत्यदेव दुबे, गिरीष कर्नाड यांच्यासोबत त्यांनी अनेक नाटकात भूमिका साकारल्या आहेत. तब्बल ४ दशके त्यांनी सिनेसृष्टीवर राज्य केले. त्यांनी बऱ्याच चित्रपटामध्ये विलनची भूमिका साकारल्यामुळे ते प्रेक्षकांच्या मनात विलन म्हणूनच वावरले.
त्यांनी १९७० ते २००५ पर्यंत जवळपास तब्बल ४०० चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांपैकी मिस्टर इंडिया मधील 'मोगँबो', 'विधाता'मधील 'जागवार', 'मेरी जंग' मधील 'ठकराल', 'त्रीदेव' मधील 'भूजंग', 'घायल' मधील 'बलवंत राय', 'करण अर्जून'मधील 'दुर्जन सिंग' हे पात्र अजुनही चाहत्यांच्या मनात घर करून राहिले आहेत. यासोबतच 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'मधील 'सिमरन'चे वडिल 'बलदेव सिंग' म्हणून आजही ते प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.