मुंबई -नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सेक्रेड गेम्स' या सिरीयलच्या दुसऱ्या पर्वात मराठमोळ्या अमृता सुभाषने रॉ एजंट कुसुम देवी यादव ही भूमिका साकारली आहे. अमृताच्या या भूमिकेला आणि अभिनयाला प्रेक्षकांनी चांगलेच वाखाणले आहे. याचे श्रेय अमृताने कथेला दिले आहे. अभिनयाविषयी बोलताना अमृता म्हणते, "चांगली पटकथा माझ्यासाठी प्रियकराच्या जागी आहे. दर्जा नसलेला आशय आणि पटकथेसोबत मी कसलेच नाते ठेवत नाही."
चांगली पटकथा माझ्यासाठी प्रियकरा सारखीच - अमृता सुभाष - अमृता सुभाष
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सेक्रेड गेम्स' या सिरीयलच्या दुसऱ्या पर्वात मराठमोळ्या अमृता सुभाषने रॉ एजंट कुसुम देवी यादव ही भूमिका साकारली आहे. अमृताच्या या भूमिकेला आणि अभिनयाला प्रेक्षकांनी चांगलेच वाखाणले आहे.
सेक्रेड गेम्सच्या दुसर्या सत्रात, अमृता केनियास्थित रॉ एजंटच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत असलेल्या गुंड गणेश गायतोंडे या व्यक्तीरेखेचा वापर देशाच्या भल्यासाठी करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. ही भूमिका आव्हानात्मक असल्याचे अमृताने सांगितले. प्रेक्षकांनी दिलेली कौतुकाची थाप अमृताच्या दमदार भूमिकेचा पुरावा आहे. याविशयी बोलताना अमृता म्हणते, "मला लोकांचा अभिप्राय खूप चांगला मिळाला. काहींनी तर मला आता 'यादव साब' म्हणून संबोधायला सुरुवात केली आहे. कथेच्या लेखनात ही व्यक्तिरेखा उत्तम रेखाटली गेली त्यामुळेच मला ती साकारणे सोपे गेले. कथा चांगली नसेल अभिनयाला अर्थ राहत नाही."
सेक्रेड गेम्स-2 च्या चित्रीकरणादरम्यान, सहकलाकार आणि बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता सैफ अली खाननेदेखील अमृताचे भरभरून कौतुक केल्याचे म्हटले जात आहे. प्रत्येक शॉटनंतर सैफ 'वाह..काय अभिनय आहे!' असे म्हणत अमृताला दाद द्यायचा, असा खुलासा खुद्द अमृताने केला आहे. अमृताने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासोबत यापूर्वी 'रमण राघव 2.0' चित्रपटात काम केले आहे. सैफसोबत काम करण्याची मात्र तिची ही पहिलीच वेळ होती.