मुंबई- गायक कुमार सानू प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगचा मोठा चाहता आहे. या युवा कलाकाराने जगभरात भारतीय संगीत पसरवल्याचा आनंद झाला असल्याचे त्याने म्हटलंय. सानूने नुकताच ‘जैमिन’ या मालिकेच्या एपिसोडमध्ये अरिजितचे 'मुस्कुराने की वजह' हे गाणे गाऊन त्याचा गौरव केला.
यानंतर अरिजितने फेसबुकवर या गाण्याची एक झलक शेअर करून सानूचे आभार मानले.
सानू म्हणाला, "अरिजीतने जगभरात भारतीय संगीताचे सादरीकरण करीत असल्याचे पाहून मला फार आनंद झाला. पाश्चिमात्य संगीताला तो भारतीय सूरांमध्ये कसा सामावून घेतो हे पाहणे आश्चर्यकारक आहे. आपल्याकडे इतक्या कमी वायाचा असा गायक आहे याचा आनंद होतो. ईश्वराने त्याला ही कला बहाल केली आहे.''
संगीत तयार करण्यासाठी 'जैमिन' बॉलिवूड आणि डिजिटल संगीत कलाकारांना एकत्र आणते.