मुंबई - सुपर मॉडेल गिगी हदीदने आपल्या पहिल्या मुलासाठी गर्भवती असतानाचा एक फोटो शेअर केला आहे. गरोदरपणात ती काय चव घेत होती याची एक झलक दाखवताना, गीगीने भारतीय मसाल्यांनी भरलेल्या तिच्या किचनमधील कॅबिनेटचा एक फोटो शेअर केला आहे.
अलीकडील सोशल मीडिया ट्रेंडचा एक भाग म्हणून हदीदने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला.
१६ सप्टेंबरपासून फोटो शेअर करण्याची विनंती चाहते करीत होते. त्या पार्श्वभूमीवर तिने हा एक फोटो पोस्ट केलाय. यात गिगीने एक छान व्यवस्था केलेला स्वयंपाकघरातील कॅबिनेटचा फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये मसाल्यांचे बॉक्स रचले आहेत. या फोटोला तिने गंमतीशीर कॅप्शन दिलंय, ''मी एक मनोरुग्ण प्रेग्नेंट व्यक्ती होते'', असे तिने हासत म्हटले आहे.