मुंबई - जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आले. त्यानंतर बॉलिवूड कलाकारांकडून अनेक प्रतिक्रिया आल्या. याशिवाय काहीजण ट्विटवरही प्रतिक्रिया देत आहे. अनेकांचे नातेवाईक काश्मीरमध्ये असून त्यांच्याशी ते संपर्क साधू शकत नाहीत. अलिकडे याच मुद्द्यावर एक ट्विट अभिनेत्री गौहर खानने केले आहे.
गौहर खानने काश्मीरी जनतेबद्दल चिंता व्यक्त करत कलम ३७० हटवण्याचा अर्थ विचारला आहे. जम्मू काश्मीरमध्ये जारी करण्यात आलेल्या जमावबंदीबाबत गौहर खानने ट्विट केले आहे.
काश्मीरी जनतेबद्दल चिंता व्यक्त करीत गौहरने लिहिले आहे, "आपल्या देशातील सुमारे ८० लाख जनता बाहेरच्या जगाशी संपर्क करू शकत नाही. कलम ३७० हटवून काश्मीरला आमच्यात सहभागी करण्याचे हे कारण होते? संपूर्ण काश्मीरी जनतेला संपर्कहिन बनवून आमच्यात सहभागी होण्याबाबत त्यांच्यात आत्मविश्वास कसा येऊ शकतो, असा सवाल त्यांनी केली आहे" यापूर्वीदेखील गौहर खानने काश्मिरमधील संपर्क सुविधांवर आणलेल्या बंदीबाबत ट्विट केले होते.
गौहर खान ही अभिनेत्री मॉडेलही आहे. मॉडेलिंगच्या काळातच तिला यश राज फिल्मच्या 'रॉकेट सिंह: सेल्समॅन ऑफ द ईयर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळाला होता. त्यानंतर तिने गेम', 'इशकजादे', 'फीवर', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' आणि 'बेगम जान' या चित्रपटातून भूमिका केल्या. याशिवाय गौहरने 'बिग बॉस 7' या शोचे विजेतेपद पटकावले आहे.