मुंबई- अभिनेत्री गौहर खान आणि नृत्यदिग्दर्शक झैद खान आता एक विवाह बंधनात अडकले आहेत. पूर्व मुंबईत एका जिव्हाळ्याच्या निकाह सोहळ्यात दोघेही बोहल्यावर चढले. सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थित हा सोहळा मुंबईच्या आईटीसी ग्रँड मराठा हॉटेलमध्ये पार पडला.
नव विवाहित दांपत्यावर अभिनंदनाचा वर्षाव
गौहर आणि झैदच्या सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निकाह लागल्यानंतर मीडियाच्या लोकांना मिठाई वाटण्यात आली. यावेळी गौहर आणि झैद खूप आनंदात दिसत होते. दोघे अनेक वर्षांपासून डेटींग करीत होते. मात्र ही गोष्ट त्यांनी मीडियापासून लपवली होती.
विवाहवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर
काही लोकांनी गौहर आणि झैदच्या या विवाहावर टीका करण्याचा व जुने वाद उगळण्याचा प्रयत्न एका वेबसाईटने केला आहे. यासाठी काही घृणास्पद मेसेजेही पाठवले आहेत अशा लोकांवर गौहर भडकल्याचे तिच्या ट्विटवरुन दिसते. तिच्या ट्विटमध्ये वेबसाइटला टॅग करीत गौहरने लिहिले की, "प्रत्येक वेळी तुमच्या रिपोर्टिंगची विचारसरणी किती घृणास्पद आहेत हे तुम्ही सिद्ध करता! तुम्हाला लाज वाटली पाहिजे!, असे तिने लिहिलंय