'गेम ऑफ थ्रोन्स' म्हणजे आमच्यासाठी कुटुंब - पिटर डिन्कलेज - thrones
'गेम ऑफ थ्रोन्स' मध्ये पिटर डिन्कलेज याने टायरिऑन लॅनिस्टरची भूमिका साकारली होती. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
!['गेम ऑफ थ्रोन्स' म्हणजे आमच्यासाठी कुटुंब - पिटर डिन्कलेज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2988804-thumbnail-3x2-game.jpg)
लॉस एंजेलिस - 'गेम ऑफ थ्रोन्स' या गाजलेल्या मालिकेचे शूटींग संपले आहे. उद्या म्हणजेच १४ एप्रिलला या मालिकेच्या शेवटच्या भागाचे प्रदर्शन होणार आहे. शेवटच्या भागाच्या शूटींगनंतर शोमधील कलाकार भावूक झालेले पाहायला मिळाले.
'गेम ऑफ थ्रोन्स' मध्ये पिटर डिन्कलेज याने टायरिऑन लॅनिस्टरची भूमिका साकारली होती. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सीरिजच्या शूटिंगदरम्यान कलाकारांनी केलेली धमाल, शोचे प्रसंग, याबद्दल पिटर यात बोलताना दिसत आहे. 'गेम ऑफ थ्रोन्स' म्हणजे आमच्यासाठी कुटुंब आहे, असेही तो म्हणाला.