मुंबई - 1 मार्च रोजी सहाव्या दिवशी रशिया-युक्रेन युद्ध ( Russia Ukraine war ) सुरू आहे. रशिया युक्रेनची राजधानी कीववर सातत्याने क्षेपणास्त्रांचा वर्षाव करत असून काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. या युक्रेनियन लोकांमध्ये मृत्यूची भीती ( Fear of death among Ukrainians ) स्पष्टपणे दिसत आहे, ते त्यांच्या रिकाम्या घरात आश्रय घेण्यासाठी इकडे-तिकडे भटकत आहेत. युद्धादरम्यान एक जोरदार बातमी समोर आली आहे. माजी मिस युक्रेन अनास्तासिया लेना ( Former Miss Ukraine Anastasiia Lenna ) या युद्धात रशियाविरुद्ध बंदूक उचलून देशाच्या सैनिकांना प्रोत्साहित करीत आहे. तिने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत.
मिस युक्रेनने हे फोटो 24 फेब्रुवारी रोजी शेअर केले होते, ज्या दिवशी युद्ध सुरू झाले होते. लष्कराच्या गणवेशातील फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करून लीनाने लोकांना रशियन सैन्याविरुद्ध बंड करण्याचे आवाहन केले. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिे लिहिले की, 'युक्रेनसोबत उभे राहा आणि यासाठी हात पुढे करा'.
आता माजी मिस युक्रेनचा ताफा लांबला असून ती रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन व्लादिमीर यांच्या सैन्याविरुद्ध रणांगणात उतरली आहे. हे वृत्त डेली मेलने प्रसिद्ध केले आहे. 2015 मध्ये मिस युक्रेन स्पर्धा जिंकलेल्या लीनाने इंस्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आणि घोषणा केली की ती रशियन सैन्याविरूद्धच्या प्रतिकारासाठी सामील होणार आहे, असे डेली मेलने वृत्त दिले आहे.