सध्याच्या कोरोना काळात सकारात्मक राहता येणे अत्यंत गरजेचे आहे. व्यायाम एक अशी गोष्ट आहे जी रोगांशी मुकाबला करण्यासाठी शरीराला नेहमी सज्ज ठेवते व त्याबरोबरच मन सकारात्मक ठेवण्यास मदत करते. ‘मॅडम सर' मालिकेत डीएसपी अनुभव सिंगची भूमिका निभावणारा अभिनेता राहिल आझम फिटनेस फ्रिक असून तो मालिकेच्या सेटवर सर्वांना व्यायामासाठी उद्युक्त करीत असतो. 'फिटनेस मला आनंदित ठेवतो' असे म्हणणाऱ्या राहीलच्या मते शरीराची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. तो म्हणतो, ‘माझ्यासाठी फिटनेस माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि यामधून मला खूप आनंद मिळतो. मला तंदुरूस्त राहायला आवडते आणि आरोग्यदायी जीवनशैली राखल्याने मला समाधान मिळते. माझ्या मते, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. धावणे किंवा व्यायाम करणे यांसारख्या कोणत्याही प्रकारच्या व्यायामामुळे तुम्हाला तंदुरूस्त राहण्यास मदत होईल आणि निश्चितच समाधान मिळेल. माझा दृढ विश्वास आहे की, फिट असणारी व्यक्ती नेहमीच उत्साहित राहते.’
राहील आझम शरीर स्वस्थ तर ठेवतोच परंतु मन प्रसन्न ठेवण्यासाठी त्याच्या देवाची आराधना करतो आणि शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी प्रार्थना करतो. तसेच स्वतःच्या व्यायामाबद्दल तो जागरूक असतो आणि त्यात खंड पडू देत नाही. त्याच्या दैनंदिन जीवनशैलीबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘मी फिटनेसला अधिक प्राधान्य देतो आणि मी माझ्या व्यायामानुसार शूटिंगचे वेळापत्रक समायोजित करतो. मी कितीही बिझी असलो तरी व्यायाम चुकवत नाही. मी काहीही करून कुठल्यातरी प्रकारचा व्यायाम करण्याचा प्रयत्न करतो. यामागील कारण म्हणजे आजारी पडून आरोग्याचे नुकसान करण्याची माझी इच्छा नाहीये. माझ्या मते, चांगला व्यायाम मला उत्तमप्रकारे काम करण्यामध्ये मदत करतो आणि मी योग्यप्रकारे व्यायाम केल्यानंतर मला दिवसभर उत्साहित व खूपच ताजेतवाने वाटते.’
व्यायामाचे अनेक प्रकार आहेत आणि त्याच्या व्यायामाबद्दल बोलताना राहील म्हणाला, ‘वेट ट्रेनिंग, कार्डियो व स्ट्रेचिंगचे उत्तम मिश्रण असलेला व्यायाम मला पुरेसा पडतो. तुमचा व्यायाम नित्यक्रम तुमच्या आवडीनुसार असावा आणि नेहमी लक्षात ठेवा की, तो इतरांना दाखवण्यासाठी नसावा. मी नेहमीच फिटनेसला अधिक प्राधान्य दिले आहे आणि मला आरोग्यदायी जीवनशैली राखायला आवडते.’ फिटनेस साठी व्यायामाबरोबरच हेल्दी खाण्यालाही तेव्हडेच महत्व आहे. राहील शरीरासाठी पोषक अन्न खातो आणि शरीराला तंदुरूस्त ठेवणारे सर्व घटक असलेले पदार्थ सेवन करतो. त्याच्यामते खाताना जास्त कॅलरीज असलेले पदार्थ टाळले पाहिजेत.