महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Box Office Collection: 'शिकारा'वर भारी पडला 'मलंग', जाणून घ्या पहिल्या दिवशीची कमाई - Malng film first day collection

७ फेब्रुवारीला 'मलंग', 'शिकारा' आणि 'हॅक्ड' हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांच्या ट्रेलरवरुन त्यांची बरीच उत्सुकता होती. पहिल्या दिवशी यापैकी कोणत्या चित्रपटाने बाजी मारली ते जाणून घेऊया..

Malng film Box Office Collection, Shikara film Box Office Collection, Hacked Film Box Office Collection, Malng film first day collection, Shikara at box office
'शिकारा'वर भारी पडला 'मलंग'

By

Published : Feb 8, 2020, 10:41 AM IST

मुंबई -बॉलिवूडसाठी नशीब बदलवणारा प्रत्येक शुक्रवार हा खास ठरतो. दर शुक्रवारी अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. त्यामुळे प्रेक्षकांनाही या चित्रपटांची आतुरता असते. यामध्ये बऱ्याच चित्रपटांची एकमेकांशी स्पर्धाही पाहायला मिळते. ७ फेब्रुवारीलाही 'मलंग', 'शिकारा' आणि 'हॅक्ड' हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांच्या ट्रेलरवरून त्यांची बरीच उत्सुकता होती. पहिल्या दिवशी यापैकी कोणत्या चित्रपटाने बाजी मारली ते जाणून घेऊया..

आदित्य रॉय कपूर, दिशा पाटणी, कुणाल खेमू आणि अनिल कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'मलंग' चित्रपटाने पहिल्या दिवशी ६ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिशा आणि आदित्यने पहिल्यांदाच एकत्र भूमिका साकारली आहे. मोहीत सुरीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

हेही वाचा -उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर तयार होणार बायोपिक, 'ओह माय गॉड' चित्रपटाचे दिग्दर्शक करणार दिग्दर्शन

'मलंग'च्या शर्यतीत दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांचा 'शिकारा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. काश्मिरी पंडितांवर आधारित हा चित्रपट आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची फारशी कमाल दिसली नाही. पहिल्या दिवशी या चित्रपटाने फक्त ७५ लाख इतकी कमाई केली आहे. यामध्ये सादिया आणि आदिल खान ही नवोदित जोडी झळकली आहे.

अभिनेत्री हीना खानची मुख्य भूमिका असलेला 'हॅक्ड' चित्रपटही ७ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले नाहीत. मात्र, 'मलंग' चित्रपटापेक्षा या चित्रपटाची कमाई फार जास्त नसेल, असा अंदाज चित्रपट समीक्षकांनी व्यक्त केला आहे. आठवड्याच्या शेवटपर्यंत हे चित्रपट किती कमाई करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा -Malang Public Review : आदित्य - दिशाच्या केमेस्ट्रीपेक्षा प्रेक्षकांना भावले अनिल कपूर

ABOUT THE AUTHOR

...view details