मुंबई - सध्या जगभरात डिजीटल माध्यमांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. चित्रपटगृहात वाढत चाललेली चित्रपटांची स्पर्धा पाहता डिजीटल माध्यमांना चांगली पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातही नेटफ्लिक्सने भारतात आपली पाळेमुळे रोवण्यात यश मिळविले आहे. नेटफ्लिक्सवर आता पहिल्यांदाच मराठी भाषेतला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
नेटफ्लिक्सवर आता मराठी 'फायरब्रँड', ट्रेलर प्रदर्शित ! - sachin khedekar
सध्या जगभरात डिजीटल माध्यमांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. चित्रपटगृहात वाढत चाललेली चित्रपटांची स्पर्धा पाहता डिजीटल माध्यमांना चांगली पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातही नेटफ्लिक्सने भारतात आपली पाळेमुळे रोवण्यात यश मिळविले आहे. नेटफ्लिक्सवर आता पहिल्यांदाच मराठी भाषेतला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
'फायरब्रँड' असे या चित्रपटाचे नाव आहे. तर, 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा हिने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. नातेसंबधातील गुंतागुत, तसेच महिला सबलीकरण अशा आशयावर हा चित्रपट आहे. २२ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते अरुणा राजे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यामध्ये अभिनेत्री उषा जाधव, गिरीष कुलकर्णी, सचिन खेडेकर आणि राजेश्वरी सचदेव यांच्या मुख्य भूमिका आहेत. उषा जाधव यात वकिलाची भूमिका साकारत आहेत.
महानायक अमिताभ बच्चन यांनीही 'फायरब्रँड' चित्रपटासाठी ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. उषा जाधव यांनी बिग बींसोबत भूतनाथ रिटर्न्समध्ये भूमिका साकारली होती.