मुंबई- दाक्षिणात्य स्टार विजय सेतुपती बॉलिवूडचे दिग्गज निर्माते दिग्दर्शक राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांच्या आगामी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ वेब सिरीजच्या स्टार कास्टमध्ये शाहिद कपूरसोबत सामील झाला आहे, अशी माहिती चित्रपट निर्मात्या जोडीने रविवारी दिली. आदल्या दिवशी शाहिदने आपण विजय सेतुपतीसोबत काम करणार असल्याचे सुतोवाच केले होते. तमिळ चित्रपट सुपर डिल्क्स आमि मास्टर या गाजलेल्या चित्रपटामुळे विजय सध्या खूप चर्चेत आहे.
राज आणि डीके यांनी विजयसोबत अमेझॉन प्राइम व्हिडिओ शोच्या सेटवरील एक फोटो शेअर केलाय, ज्यात राशी खन्ना देखील होते. "मक्कल सेल्वान इन दा," असे या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे. तमिळ भाषेत याचा अर्थ "लोकांचा खजिना" असा होतो.
राशी खन्नाने विजय सेतुपतीचे सेटवर स्वागत केले. ''माझ्या आवडत्या कलाकारासोबत तिसऱ्यांदा यावेळी हिंदीत काम करीत आहे..! आमच्या सेटवर विजय सेतुपती सर आपले स्वागत आहे'', असे राशीने म्हटलंय.