महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सूरज पांचोलीने ठोकला इन्स्टाग्रामला राम राम, म्हणतो, "आता या दिवशी भेटू..." - दिशा सालियान मृत्यू प्रकरण

अभिनेता सूरज पंचोलीने सोशल मीडियापासून स्वत: ला दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने काल रात्री इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट वगळता आपली सर्व पोस्ट हटविल्या आहेत. सुशांत आणि दिशाच्या निधनानंतर गेल्या अनेक दिवसांपासून सूरज पंचोली याला लक्ष्य केले जात होते. अभिनेत्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर इंस्टाग्राम सोडण्याविषयी माहिती दिली आणि परत येण्याचे संकेतही दिले.

Suraj Pancholi
सूरज पंचोली

By

Published : Aug 22, 2020, 7:53 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता सूरज पंचोली याचे नाव दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियन यांच्या निधनानंतर चर्चेत आहे.

सोशल मीडियावर, युजर्स त्याला विविध प्रकारच्या गोष्टी ऐकवत आहेत. अशा परिस्थितीत सूरजने एक मोठे पाऊल उचलले आणि इन्स्टाग्राम सोडले. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फोटो वगळता सर्व पोस्टही हटविल्या आहेत.

सूरज पंचोलीने इन्स्टाग्राम सोडले

या अभिनेत्याने इन्स्टाग्राम स्टोरीवरही इंस्टाग्राम सोडण्याविषयी एक संदेश लिहिला होता, ज्यात त्याने लिहिले आहे की, "पुन्हा भेटूया इंस्टाग्राम, ज्या दिवशी हे जग एक चांगले स्थान होईल, त्यादिवशी भेटण्याची आशा आहे.''

असा संदेश देऊन सूरज पांचोलीने इन्स्टाग्राम सोडले आहे. त्याच्या संदेशावरून हे स्पष्ट होते की सोशल मीडियावर ट्रोल झाल्यामुळे तो नाराज झाला होता. सुरजने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकलेल्या एका फोटोत असे दिसते की त्याच्या हातात मेणबत्त्या आहेत.

सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात सूरज पांचोलीचे नाव सतत जोडले जात होते. त्यानंतर सूरज समोर आला आणि स्पष्टीकरणही दिले. तो म्हणाला की, आपण दिशाला ओळखतही नव्हतो.

ABOUT THE AUTHOR

...view details