महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 17, 2020, 1:14 PM IST

ETV Bharat / sitara

'तो जिंदा हो तुम', फरहान अख्तरने कवितेद्वारे केले काळजी घेण्याचे आवाहन

फरहान अख्तरच्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटातील 'तो जिंदा हो तुम' ही कविता फार गाजली होती. आजही सोशल मीडियावर या कवितेच्या क्लिप्स व्हायरल होत असतात. ही कविता फरहानच्या आवाजात प्रदर्शित झाली होती. आता याच कवितेचा आधार घेऊन फरहानने कोरोनाविषयी जनजागृती केली आहे. त्याने सोशल मीडियावर आपल्या कवितेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Farhan Akhtar Presents Corona virus version of Toh Zinda ho Tum
'तो जिंदा हो तुम', फरहान अख्तरने कवितेद्वारे केले काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी अधिक सतर्क होणं गरजेचं ठरत आहे. नागरिकांमध्ये कोरोना विषाणूविषयी जनजागृती करण्यासाठी आत्तापर्यंत अनेक कलाकार सोशल मीडियाचा आधार घेऊन व्हिडिओद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत. आता अभिनेता फरहान अख्तरनेही एका कवितेद्वारे चाहत्यांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

फरहान अख्तरच्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटातील 'तो जिंदा हो तुम' ही कविता फार गाजली होती. आजही सोशल मीडियावर या कवितेच्या क्लिप्स व्हायरल होत असतात. ही कविता फरहानच्या आवाजात प्रदर्शित झाली होती. आता याच कवितेचा आधार घेऊन फरहानने कोरोनाविषयी जनजागृती केली आहे. त्याने सोशल मीडियावर आपल्या कवितेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या कवितेतून त्याने चाहत्यांना सुरक्षितता आणि खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

फरहानच्या कवितेच्या ओळी -

'चेहरे पर अपने मास्क पेहन रहे हो तो जिंदा हो तुम

हाऊस पार्टी पर यारो से बात कर रहे हो तो जिंदा हो तुम

छिंको के झुंकोसे तुम दूर रेहना सिखो, भिडों मे शामिल होने को नही केहना सिखो

हर इंसान से तुम मिलो बांध के अपनी बाहें, हल पल एक्झिट साईट को दिखे वो निगाहे, जो पॉकेट में सॅनिटायझर रख रहे हो तो जिंदा हो तुम...'

ABOUT THE AUTHOR

...view details