मुंबई -बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर 'भाग मिल्खा भाग' चित्रपटानंतर ओमप्रकाश मेहरांच्या 'तुफान' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो बॉक्सरची भूमिका साकारणार आहे. त्यासाठी तो जिममध्ये अथक मेहनत घेताना दिसतो. आत्तापर्यंत त्याने या चित्रपटाबाबत बरेचसे अपडेट्स चाहत्यांशी शेअर केले आहेत. तसेच, तो या चित्रपटाची कशी तयारी करतो, याचे व्हिडिओ देखील त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या त्याच्या अशाच एका व्हिडिओची चर्चा पाहायला मिळतेय.
फरहान अख्तरने आत्तापर्यंत बरेचसे चित्रपट साकारले आहेत. दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा यांच्या २०१३ साली आलेल्या 'भाग मिल्खा भाग' चित्रपटात त्याने मिल्खा सिंग यांची व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची बरीच प्रशंसा झाली. आता पुन्हा एकदा ओमप्रकाश मेहरा आणि फरहान 'तुफान' चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.