महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शमिता शेट्टी आणि राकेश बापटचे रोमँटिक लाईव्ह सेशन, चाहत्यांच्या प्रश्नावर लाजली शमिता - राकेश आणि शमिताला 'शारा' टोपणनाव

अभिनेत्री शमिता शेट्टीचा अभिनेता-मॉडेल राकेश बापट यांची रोमँटिक मैत्री बिग बॉस ओटीटीच्या नुकत्याच संपलेल्या पहिल्या सिझनमध्ये पाहायला मिळाली. बाहेर आल्यानंतरही दोघांचा रोमान्स सुरू आहे. राकेश आणि शमिताला इंस्टाग्रामवर लाइव्ह सेशनदरम्यान विविध प्रश्नांचा भडिमार झाला.

शमिता शेट्टी आणि राकेश बापटचे रोमँटिक लाईव्ह सेशन
शमिता शेट्टी आणि राकेश बापटचे रोमँटिक लाईव्ह सेशन

By

Published : Sep 27, 2021, 5:38 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीचा अभिनेता-मॉडेल राकेश बापट यांची रोमँटिक मैत्री बिग बॉस ओटीटीच्या नुकत्याच संपलेल्या पहिल्या सिझनमध्ये पाहायला मिळाली. हे जोडपे शोचे आकर्षण ठरले होते. यांचा चाहता वर्गाही मोठाा आहे. 'शारा' या टोपणनावाने ते या जोडप्याला ओळखतात. या दोघांनी जेव्हा प्रश्न उत्तराच्या सेशनसाठी लाईव्ह येण्याचे ठरवले तेव्हा चाहत्यांकडून अनेक बोल्ड प्रश्न त्याच्यासाठी तयार होते.

राकेश आणि शमिताला इंस्टाग्रामवर लाइव्ह सेशनदरम्यान विविध प्रश्नांचा भडिमार झाला. ज्या गोष्टींनी त्यांना एकमेकांकडे सर्वात जास्त आकर्षित केले अशा प्रश्नांपासून ते त्यांना चीड आणणाऱ्या प्रश्नापर्यंत चाहते प्रश्न विचारत होते.

जेव्हा राकेश स्क्रिनवर आला तेव्हा तिथे शमिता चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी बसली होती. चाहत्यांनी त्यांना विचारले की तुम्ही रिलेशनशीपमध्ये आहात का यावर या जोडप्याने स्पष्ट केले की ते अद्याप एकत्र राहत नाहीत.

राकेशच्या मनाला धक्का देणारा आणखी एक प्रश्न एका चाहत्याचा होता. जर शमिताला रंगवायचे असेल तर पेटिंगला कुठुन सुरुवात करशी? या खोडकर प्रश्नावर राकेश थक्क झाला तर शमिता लाजून लाल झाली.

राकेशला शिल्पकला आणि चित्रकलेचीही आवड आहे, त्याने हृदयस्पर्शी उत्तर दिले आणि म्हणाला: "मला वाटते की तिला समुद्रकिनाऱ्यावर उभे राहून रंगवायला आवडेल, तिच्या समोर समुद्र आणि तिच्या केसांमधून वाऱ्याची झुळूक . त्याच्या उत्तराने प्रभावित होऊन शमिता म्हणाली: "वाह, हे सुंदर आहे."

चाहत्यांनी राकेशला 2 ऑक्टोबरला बिग बॉस 15 मध्ये प्रवेश करणाऱ्या शमितासोबत बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याची विनंती केली.

हेही वाचा - सलमान ऑस्ट्रियातून परतला, रितेश-जेनेलिया लंच डेटवर झाले कॅमेऱ्यात कैद

ABOUT THE AUTHOR

...view details