मुंबई- मनोरंजनसृष्टीत विनोदी अभिनेत्री फार कमी आहेत. तसेच ‘स्टॅन्ड अप कॉमेडी’ हा प्रकार देखील फारच कमी स्त्री कलाकार हाताळताना दिसतात. परंतु तृप्ती खामकर एक उत्तम विनोदी अभिनेत्री तर आहेच परंतु तिचे ‘स्टॅन्ड अप कॉमेडी’ ॲक्ट्स प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. तृप्ती विविधांगी भूमिका साकारत असते आणि लहानश्या भूमिकेतूनही आपली छाप सोडत असते. नुकताच तिला एक सुखद अनुभव मिळाला ‘गिरगिट’ ही वेब सिरीज करताना. ‘माझ्या २३-२४ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मला मुख्य भूमिका साकारायला मिळाली. त्याबद्दल आनंदच आहे. माही नावाची ही मुलगी अतिशय छान आहे, निरागस आहे आणि सर्वांवर प्रेम करणारी आहे. मेहनतीवर तिचा विश्वास आहे आणि तिला सर्व जग सुंदर वाटते. ही भूमिका साकारताना मला खूप मजा आली आणि माझे सांभाळून घेणारे सहकलाकार आणि समजून घेणारे व समजावून सांगणारे दिग्दर्शक यांची मी ऋणी आहे. खरंतर आम्ही एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे राहत होतो आणि शूटिंग दरम्यान काहीही वंगाळ घडले नाही यावरून कल्पना येईल आमच्या सर्वांच्या बॉण्डची. एकंदरीत माझा अनुभव सुखावह होता’, असे तृप्तीने सांगितले.
तृप्ती खामकर म्हणते, ‘प्रत्येक कलाकाराचं काम बोलत असतं’ - एमएक्स प्लेयर
मनोरंजनसृष्टीत विनोदी अभिनेत्री फार कमी आहेत. तसेच ‘स्टॅन्ड अप कॉमेडी’ हा प्रकार देखील फारच कमी स्त्री कलाकार हाताळताना दिसतात. परंतु तृप्ती खामकर एक उत्तम विनोदी अभिनेत्री तर आहेच परंतु तिचे ‘स्टॅन्ड अप कॉमेडी’ ॲक्ट्स प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. तृप्ती विविधांगी भूमिका साकारत असते आणि लहानश्या भूमिकेतूनही आपली छाप सोडत असते. नुकताच तिला एक सुखद अनुभव मिळाला ‘गिरगिट’ ही वेब सिरीज करताना. ‘माझ्या २३-२४ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मला मुख्य भूमिका साकारायला मिळाली. त्याबद्दल आनंदच आहे. माही नावाची ही मुलगी अतिशय छान आहे, निरागस आहे आणि सर्वांवर प्रेम करणारी आहे. मेहनतीवर तिचा विश्वास आहे आणि तिला सर्व जग सुंदर वाटते. ही भूमिका साकारताना मला खूप मजा आली आणि माझे सांभाळून घेणारे सहकलाकार आणि समजून घेणारे व समजावून सांगणारे दिग्दर्शक यांची मी ऋणी आहे. खरंतर आम्ही एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे राहत होतो आणि शूटिंग दरम्यान काहीही वंगाळ घडले नाही यावरून कल्पना येईल आमच्या सर्वांच्या बॉण्डची. एकंदरीत माझा अनुभव सुखावह होता’, असे तृप्तीने सांगितले.

तृप्ती खामकर
गिरगिट ही एक मर्डर मिस्टरी थ्रिलर वेब सिरीज आहे, जी प्रत्येक भागात उत्सुकता वाढवत ठेवते. 7 भागांची ही सिरीज अल्ट बालाजीची पेशकश असून ती अल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेयरवर उपलब्ध आहे ज्यात मराठमोळी तृप्ती खामकर मध्यवर्ती भूमिकेत आहे.
हे ही वाचा -Rajkummar Rao-Patralekhaa engaged : राजकुमार राव-पत्रलेखाचा साखरपुडा
Last Updated : Nov 14, 2021, 10:40 PM IST