महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ग्लॅमरस आणि स्ट्राँग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार इशा गुप्ता - इशा गुप्ता

ही एक नाट्यमय अ‌ॅक्शन थ्रीलर मालिका आहे. या मालिकेत मसी वली, अनिशा व्हिक्टर, आयुष खुराणा, रिद्धी खखर, प्रभनित सिंग, पूजा शेट्टी आणि तन्वी शिंदे यांच्या भूमिका आहेत. झी फाईव्हवर याचे प्रसारण होईल.

Esha Gupta
इशा गुप्ता

By

Published : May 8, 2020, 5:34 PM IST

मुंबई - अभिनेत्री इशा गुप्ता REJCTX 2 या वेब मालिकेतून डिजीटल माध्यमात पदार्पण करीत आहे. यात तिची पोलीसची भूमिका असेल. आजपर्यंत रंगवलेल्या व्यक्तिरेखाहून ही भूमिका वेगळी असल्याचे तिने म्हटलंय.

REJCTX 2चे पोस्टर अखेर प्रदर्शित झाले असून यात इशा खूपच ग्लॅमरस दिसत आहे. याबद्दल तिने म्हटलंय, ''मी REJCTX 2 मधून डिजीट डेब्यू करीत आहे. यातील माझी भूमिका ग्लॅमरस आणि स्ट्राँग पोलीस अधिकाऱ्याची आहे, परंतु याचे रहस्य हळू हळू उलगडत जाईल.''

''आतापर्यंत मी जरी पोलिसाची भूमिका केली असली तरी ही व्यक्तीरेखा संपूर्ण वेगळी आहे. यातून मी डिजीटलच्या अद्भूत जगात प्रवेश करीत असून REJCTX2 हे त्याच्यासाठी योग्य आहे. मला खात्री आहे पहिल्या सीझनपासून माझ्या फॅन्सना ही मालिका आवडली असेल आणि ते दुसऱ्या सीझनमध्ये मी असल्यामुळे पाहतील. याचा प्रीमियर १४ मे रोजी होणार आहे.'', असेही तिने पुढे म्हटलंय.

इशा यात सिंगापूरच्या पोलिसाची भूमिका साकारत आहे. या मालिकेचा दुसरा सिझन गोल्डी बहेल दिग्दर्शित करीत असून त्यांची ही निर्मिती आहे. ही एक नाट्यमय अ‌ॅक्शन थ्रीलर मालिका आहे. या मालिकेत मसी वली, अनिशा व्हिक्टर, आयुष खुराणा, रिद्धी खखर, प्रभनित सिंग, पूजा शेट्टी आणि तन्वी शिंदे यांच्या भूमिका आहेत. झी फाईव्हवर याचे प्रसारण होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details