महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ईशा देओल पुन्हा होणार आई, पाहा 'बेबी शॉवर'चे फोटो - dharmendra

ईशा देओलने बॉलिवूडमध्ये फारच कमी चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर तिने भारत तख्तानीसोबत लग्न केले. तिला राध्या नावाची मुलगी आहे. आता पुन्हा एकदा तिच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे.

ईशा देओल पुन्हा होणार आई, पाहा 'बेबी शॉवर'चे फोटो

By

Published : May 7, 2019, 8:05 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल चित्रपटांपासून दूर आपल्या संसारात व्यस्त आहे. दोन वर्षांपूर्वी तिच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले होते. आता पुन्हा एकदा ती आई होणार आहे. तिने तिच्या 'बेबी शॉवर'चे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

ईशा देओल आणि भारत तख्तानी

ईशा देओलने बॉलिवूडमध्ये फारच कमी चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर तिने भारत तख्तानीसोबत लग्न केले. तिला राध्या नावाची मुलगी आहे. आता पुन्हा एकदा तिच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे.

ईशाचे नातेवाईक
अलिकडेच तिच्या 'बेबी शॉवर'चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तिच्या मैत्रिणींसह जवळचे नातेवाईक उपस्थित होते. तिने भारत तख्तानीसोबतचा एक खास फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ईशाची गर्ल्स गँग

'तब्बल दोन वर्षांनंतर मी हा क्षण पुन्हा अनुभवत आहे. मी माझ्या मित्रमंडळींचे आणि कुटुंबाचे आभार मानते, त्यांनी मला ही खास भेट दिली आहे', असे तिने तिच्या फोटोंवर कॅप्शन दिले आहे.

ईशाची पोस्ट
बेबी शॉवरचा केक
ईशा अलिकडेच 'केकवाक' या वेबसीरिजमध्ये दिसली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details