ठाणे - देशात एकीकडे आर्थिक मंदी वातावरण असताना दुसरीकडे सोन्याच्या वस्तूंना प्रचंड मागणी दिसून येतेय. मग ते सोन्याचे दागिने असोत किंवा सोन्याची मिठाई. होय ठाण्यात सोन्याची मिठाई बनवण्यात आली आहे, जिचा भावदेखील सोन्या सारखाच आहे. तब्बल 11 हजार रुपये किलोने ही मिठाई विकली जातेय.
११ हजार रुपये किलोची मिठाई खरेदीसाठी ठाण्यात झुंबड
सोन्याचा भाव गगनाला भिडलेला असताना, सोने खरेदी देखील होत आहे. मात्र सोन्याची मिठाईदेखील महाग असून ग्राहकांची तितकीच मागणी आहे.
सोन्याचा भाव गगनाला भिडलेला असताना, सोने खरेदी देखील होत आहे. मात्र सोन्याची मिठाईदेखील महाग असून ग्राहकांची तितकीच मागणी आहे. ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानात ही मिठाई बनवली गेलीय. या सोन्याच्या मिठाईला खास आकर्षक अशी बॉक्सची पॅकिंग देखील करण्यात आली आहे. या मिठाईच्या जे जिन्नस वापरले आहेत ते देखील उच्च प्रतिचे महागडे असे असल्याने सोन्याची मिठाई अतिशय महाग आहे.
मागील अनेक वर्षांपासून ही मिठाई दिवाळीमध्ये तयार केली जाते आणि त्याला ठाणेकर चांगला प्रतिसाददेखील देत आहेत. काही वर्षापूर्वी ही मिठाई आयकर खात्याच्या राडारवर देखील आली होती.