मुंबई- दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांमधून विविध सरकारी योजनांचा प्रचार केल्याच्या तक्रारीची दखल आता राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. यासोबतच असा प्रचार करणाऱ्या झी टीव्ही आणि अँड टीव्हीवरील मालिकांच्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
टी.व्ही. मालिकांमधून प्रचार करणाऱ्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाची नोटीस - tula pahte re
मालिकांमधून केंद्र शासनाच्या योजनांचा प्रचार करून आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल मुख्य निवडणूक कार्यालयाने घेतली आहे
झी आणि अँड टीव्हीवरील मालिकांमधून केंद्र शासनाच्या योजनांचा प्रचार करून आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल मुख्य निवडणूक कार्यालयाने घेतली आहे. असा प्रचार करणाऱ्या या दोन्ही वाहिन्यांवरील संबंधित मालिकांच्या निर्मात्यांना २४ तासात त्यांचे म्हणणे मांडण्यास या नोटीसद्वारे सांगितले आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर पुढील योग्य ती कार्यवाही आयोगाकडून करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.
अँड टीव्हीवरील भाभीजी घर पर हैं तर झी टीव्हीवरील तुला पाहते रे या मालिकांमधून भाजपच्या सरकारी योजनांचे गुणगान गाण्यात आले होते. मालिकेच्या याच भागांवर अनेकांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. यासोबतच झी आणि अँड टीव्हीचे प्रक्षेपण थांबवा आणि भाजपचा प्रचार करणाऱ्या मालिकांवर कारवाई करा, अशी मागणीही काँग्रेसने केली होती.