मुंबईः पार्थ समथानची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निर्माती एकता कपूरने त्याच्या आगामी मैं हिरो बोल रहा हूँ या नव्या मालिकेतील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.
एकता कपूरने आगामी मालिकेचा टिझर शेअर करीत सोशल मीडियावर लिहिलंय, "पार्थ, लवकर बरा हो. पार्थ समथानची कसौटी...हिरोची प्रतीक्षा करीत आहे."
टिझर क्लिपमध्ये, पार्थ एका गुंडाच्या अवतारात दिसत आहे. त्याचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
''नव्या रुपातील पार्थ. याची वाट पाहात आहोत'', असे एका युजरने लिहिलंय.
"पार्थ गुंडांच्या भूमिकेत खूप चांगला दिसत आहे," असे एका अन्य चाहत्याने लिहिले आहे.
कसौटी जिंदगी के मधील अनुराग बासूची भूमिका साकारणाऱ्या पार्थने सांगितले की, त्याला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. त्याने टेस्ट केली आहे. म्हणून माझ्यासोबत असलेल्या सर्वांनी टेस्ट करावी अशी विनंती करीत आहे. त्याने इन्स्टाग्रामवर अशी पोस्ट लिहिली आहे.
हेही वाचा - अभिषेक बच्चनचा 'ब्रिथ' मालिकेतला सहकारी अमित साधची कोरोना चाचणी आली निगेटिव्ह
पार्थने पुढे सांगितले की, तो आता सेल्फ क्वांरटाईनमध्ये असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) संपर्कात आहे. "बीएमसी नियमितपणे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क साधत आहे. मी स्वत: ला अलग ठेवत आहे आणि त्यांच्या सर्व सहकार्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. कृपया सुरक्षित रहा आणि काळजी घ्या," असे त्याने पोस्टमध्ये लिहिलंय.
पार्थ हा एकताच्या 'कसौटी जिंदगी के' या डेली सोपचा एक भाग आहे आणि मागील काही दिवसांपासून या शोचे शूटिंग करत होता. त्याने कोरोनाव्हायरसच्या संपर्कात आला होता आणि सध्या तो घरी क्वारंटाईनमध्ये आहे.