मुंबई - जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा असलेले ३७० हे कलम रद्द करण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आलाय. यावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनुपम खेर यांनी ही एक चांगली सुरूवात असल्याचे म्हटले होते. तर कमाल आर. खानने आता काश्मिरी मुलीशी लग्न करुन बंगला घेण्यास मोकळा असल्याचे ट्विट केले होते.
बॉलिवूड चित्रपट आणि मालिकांची निर्माती एकता कपूरनेही ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकताने लिहिलंय, ''हा एक कट्टरवादी निर्णय आहे. परंतु, या क्षणी त्याची आवश्यकता होती. काश्मीर सुरक्षित होईल, हीच अपेक्षा. ऐतिहासिक दिवस.''