महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता', 'त्या' वादग्रस्त फोटोवर निलेश साबळेचा माफीनामा - Dr. Nilesh Sabale Apology on controversy of CHYD

राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी यांनी सोशल मीडियाद्वारे निषेध व्यक्त केला होता.

Dr. Nilesh Sabale on controversy of Chala Hava yeu dya
'कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता', 'त्या' वादग्रस्त फोटोवर निलेश साबळेचा माफीनामा

By

Published : Mar 14, 2020, 11:49 PM IST

मुंबई -महाराष्ट्रासह देशभरात लोकप्रिय असलेला 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी यांनी सोशल मीडियाद्वारे निषेध व्यक्त केला होता. त्यांनी केलेल्या ट्विटनंतर अनेकांनी या कार्यक्रमाविरोधात प्रतिक्रिया दिल्या. या प्रकरणाबाबत आता कार्यक्रमाचा सुत्रसंचालक निलेश साबळे यांनी व्हिडिओ शेअर करुन माफी मागितली आहे.

निलेश साबळे यांनी फेसबुक पेजच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये त्यांनी या प्रकरणाचे स्पष्टीकरण देत कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. ही एक तांत्रिक चुक होती. आम्ही सर्वांचा आदर करतो. यापुढेही करत राहू, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम वादात : 'हवा डोक्यात घुसली' - संभाजीराजे छत्रपती

ज्या फोटोवरून वाद झाला ते स्कीट वेगळ्या अर्थाने वेगळ्या कारणासाठी दाखवण्यात आला होता. मात्र, त्यामुळे गैरसमज निर्माण झाले. देशातील सर्व महान व्यक्तींबद्दल आम्हाला आदर आहे, असे म्हणून निलेश साबळे यांनी दिलगिरी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details