महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अमोल कोल्हेंच्या डोळ्यात अश्रू - 'स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप

शेवट.. गोड व्हावा म्हणुन आज स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिकेची संपूर्ण टीम छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भूमी असलेल्या वढू बुद्रुक येथे नतमस्तक झाली. यावेळी मागील सात ते आठ वर्षापासून या मालिकेचा संघर्ष कसा घडला हे सांगताना अभिनेता व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे डोळे भरून आले...!

dr-amol-kolhe-get-immotional-
अमोल कोल्हेंच्या डोळ्यात अश्रू

By

Published : Feb 15, 2020, 4:05 PM IST

Updated : Feb 15, 2020, 4:13 PM IST

पुणे - गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेचा शेवट जवळ आल्याचं दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगत जनतेचे आभार मानले.

'स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अमोल कोल्हेंच्या डोळ्यात अश्रू

काही चुकलं, राहिलं असेल तर माफ करा, असे म्हणत कोल्हेंना यावेळी अश्रू अनावर झाले.. छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भूमी असलेल्या वढू बु, येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. दरम्यान मालिकेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास मांडला तो तसाच पुढील ३५० पेक्षा जास्त वर्ष माणसांच्या मनावर राज्य करेल असा विश्वास अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

Last Updated : Feb 15, 2020, 4:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details