महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

डॉ. श्रीराम लागूंनी पाहिलेली 'ही' ठरली शेवटची नाटकं, कलाकारांना दिली होती कौतुकाची थाप - अनन्या

गेल्या काही वर्षात डॉक्टरांना स्मृतिभ्रंशाच्या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे अनेकदा त्यांना गोष्टी नीट आठवायच्या नाहीत. मात्र, तरीही नाटक पाहताना आपण काय पाहतोय? त्याचे अचूक भान त्यांना होते. विशेष म्हणजे स्वतः वृद्धापकाळामुळे नीट बोलू शकत नव्हते. तरीही पत्नी दीपा श्रीराम त्यांना कायम नाटकाला घेऊन जात.

doctor shriram lagoo last seen play
डॉ. श्रीराम लागूंनी पाहिलेली शेवटची नाटकं

By

Published : Dec 18, 2019, 8:23 AM IST

मुंबई -डॉ. श्रीराम लागू म्हणजे मराठी रंगभूमीवरचे अनभिषिक्त नटसम्राट. त्यांनी कौतुक केलेल्या नाटकाचं विशेष महत्त्व अखेरपर्यंत मराठी रंगभूमीवर कायम राहील. 'संगीत देवबाभळी' आणि 'अनन्या' या नाटकांमध्ये काम करणाऱ्या नटांना डॉक्टरांनी कौतुकाची थाप दिली. मात्र, हीच दोन नाटकं त्यांनी पाहिलेली शेवटची व्यावसायिक नाटकं ठरली. त्यांनी दिलेली कौतुकाची थाप विसरण्यासारखी नाही, असे नाटकातील कलाकारांनी सांगितले.

अभिनेत्री मानसी जोशी आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे यांची प्रतिक्रिया

गेल्या काही वर्षात डॉक्टरांना स्मृतिभ्रंशाच्या त्रासाने ग्रासले होते. त्यामुळे अनेकदा त्यांना गोष्टी नीट आठवायच्या नाहीत. मात्र, तरीही नाटक पाहताना आपण काय पाहतोय? त्याचे अचूक भान त्यांना होते. विशेष म्हणजे ते वृद्धापकाळामुळे नीट बोलू शकत नव्हते. मात्र पत्नी दीपा श्रीराम त्यांना कायम नाटकाला घेऊन जात. गेल्यावर्षी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेली 'संगीत देवबाभळी' आणि 'अनन्या' ही दोन्ही नाटकं डॉक्टरांनी पाहिलेली होती. ही दोन्ही नाटकं त्यांना कमालीची आवडली. नाटकानंतर त्यांनी या नाटकातील कलाकारांना मनापासून दाद दिली होती. मंगळवारी डॉ. लागू गेल्याची बातमी समजताच या नाटकातील कलाकारांना अश्रूंचा बांध रोखता आला नाही.

हे वाचलं का? - नटसम्राट हरपला, श्रीराम लागूंचा रंगभूमीवरील जीवनप्रवास

'संगीत देवबाभळी' नाटकात काम करणारी अभिनेत्री मानसी जोशी हिने, 'आपल्या जवळची एखादी व्यक्ती गेली की धक्का हा बसतोच. मात्र, प्रत्येकाची जाण्याची एक वेळ असते, असे सांगितले. डॉक्टरांनी आमच्या संगीत देवबाभळी या नाटकाच्या प्रयोगाला हजेरी लावून माझ्या आणि शुभांगीच्या कामाचे कौतुक केले होते. त्यांचे ते शब्द आयुष्यभर मनात कोरलेले राहतील, अशा भावना मानसीने व्यक्त केल्या. तसेच देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असे म्हणत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

हे वाचलं का? - 'मराठी रंगभूमीला सुवर्ण काळात आणणाऱ्या दिग्गजांपैकी डॉ. लागू हे एक'

'अनन्या' या नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिनेही 'डॉ. लागू यांच्या जाण्याने खूप मोठा धक्का बसला असल्याचं सांगितलं. त्यांनी अनन्या नाटकाच्या प्रयोगाला उपस्थित राहून आम्हा सगळ्या कलाकारांचं केलेलं कौतुक कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असे ऋतुजा म्हणाली.

डॉ. लागूंना आजारपणामुळे जास्त वेळ एका जागी बसून राहणे शक्य नव्हते. मात्र, त्यांनी दोन्ही नाटकं आवर्जून पाहिली. मात्र, दुर्दैवाने ही नाटकं त्यांनी पाहिलेली अखेरची व्यावसायिक नाटकं ठरली.

ABOUT THE AUTHOR

...view details