'वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्से'मध्ये वागळे कुटुंबीय दर आठवड्याला नवीन संघर्षाला सामोरं जात असतं आणि त्यावर मातही करीत असतं. त्यांच्या संघर्षांचे निराकरण करण्याच्या पद्धती बघून भारतीयांचा मूड उत्साहित होत असतो. मालिका तीन विभिन्न पिढ्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनोरंजनपूर्ण गरजांची पूर्तता करीत असते आणि म्हणूनच ही भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय व आवडती मालिका बनली आहे. 'वागले की दुनिया' मध्ये दिवाळी सण साजरा होत आहे. मालिकेच्या माध्यमातून हृदयस्पर्शी साधेपणा व आनंद पसरवत असणाऱ्या कलाकारांसाठी यंदाची दिवाळी अधिक खास आहे, कारण त्यांनी धमाल दिवाळी पार्टीसह सेटवर दीपावलीचा सण साजरा केला.
सर्वांनी धमाल करीत गेम्स खेळात दिवाळीची पार्टी साजरी केली. कलाकारांची दोन टीम्समध्ये विभागणी करण्यात आली आणि धमाल खेळांना सुरूवात झाली. लाडू बनवण्याच्या कृतीदरम्यान दोन्ही टीम्समध्ये उत्तम स्पर्धा रंगली आणि त्यानंतर अंताक्षरी मैफिलीसह वातावरण अत्यंत मधुरमय झाले. प्रमुख कलाकारांनी त्यांची आवडती गाणी सादर केली. मालिकेप्रमाणेच पार्टीचे वातावरण देखील हास्यपूर्ण, गप्पागोष्टी व गमतीजमतींनी भरलेले होते, ज्यामधून त्यांच्यामधील सुरेख नात्याचे अस्सल साजरीकरण दिसून आले.
राजेश वागळेची भूमिका साकारणारा सुमीत राघवन म्हणाला, ''सेटवर काम करताना नेहमीच खूप धमाल येते. मला मालिका सादर करत असलेल्या या कथांमधून माझ्या जीवनातील जुन्या घटनांची आठवण येते. यंदाची दिवाळी अधिक खास बनली आहे, कारण मला माझ्या सर्व सह-कलाकारांसोबत दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली. मला लाडू बनवण्याची स्पर्धा आवडली. हा माझा दिवाळीतील आवडता फराळ आहे आणि लाडू बनवण्याच्या स्पर्धेदरम्यान माझ्यामधील लहान मूल समोर आले. मला सांगावेसे वाटते की, मी काहीसा अधिक स्पर्धात्मक झालो. असो, ही धमाल व मौजमजा प्रेक्षक व चाहत्यांशिवाय शक्य झाली नसती, जे आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. माझ्याकडून सर्वांना आनंदी व समृद्ध दिवाळीच्या शुभेच्छा!''
'वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्से' प्रत्येक भारतीय कुटुंबाच्या उत्साहाला सादर करण्यासोबत दिवाळीच्या उत्साहाप्रमाणे सकारात्मकता व आशेसह त्यांच्या समस्यांना सादर करते. राधिका वागळेची भूमिका साकारणा-या भारती आचरेकर म्हणाल्या, ''मालिका 'वागले की दुनिया' प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे आणि आमचा खुल्या मनाने स्वीकार करण्यासोबत आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी मी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते. 'वागले परिवार' हे माझे दुसरे कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याची ही संधी मिळाल्याने मला खूप आनंद झाला. आमच्या मालिकेची संकल्पना प्रेक्षकांशी संबंधित आहे आणि आवडत्या कलाकारांसोबत हा सण साजरा करण्यासारखा दुसरा उत्तम आनंद कोणता असेल? यंदा दिवाळीनिमित्त मी माझे चाहते व शुभचितंकांना आपल्या कुटुंबांसोबत वेळ व्यतित करण्याचे आणि या सणाचा अधिकाधिक आनंद घेण्याचे आवाहन करते. माझ्याकडून प्रेक्षकांना आनंदी व समृद्ध दिवाळीच्या शुभेच्छा!''
वंदना वागळेची भूमिका साकारणारी परिवा प्रणती म्हणाली, ''सेटला दिवाळीच्या झगमगाटामध्ये बदललेले पाहून खूपच आनंद झाला. मला माझ्या सह-कलाकारांसोबत दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाल्याचा आनंद होत आहे. आमच्यामध्ये अत्यंत दृढ नाते झाले आहे आणि आम्ही वास्तविक कुटुंबासारखेच आहोत. मी त्यांच्यासोबत अंताक्षरी खेळताना खूप धमाल केली आणि माझ्या बालपणाची आठवण झाली, जेथे कोणतीही पार्टी अंताक्षरीशिवाय संपायची नाही. मालिका 'वागले की दुनिया' मला माझ्या जीवनातील विविध टप्प्यांची आठवण करून देते. प्रत्येक भूमिका तरूण असो वा वृद्ध, आपण सर्वांनी सामना केलेल्या स्थितींमधून गेलेली असते आणि ही स्थिती हलक्या-फुलक्या उत्साहासह सादर करताना खूपच चांगले वाटते. आपणा सर्वांमध्ये वंदना किंवा राजेश किंवा सखी व अथर्वसारखे कोणीतरी असतेच आणि मला वाटते की, प्रेक्षकांना मालिकेबाबत हीच बाब अधिक आवडते. आम्हाला त्या भूमिका साकारण्याची आणि प्रेक्षकांच्या चेह-यांवर हास्य आणण्याची संधी मिळाल्याने मला खूप धन्य वाटते.''
'वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्से' ही विनोदी कौटुंबिक मालिका प्रसारित होते सोनी सबवर दर सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता.
हेही वाचा - ‘इमेल फिमेल’ ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित!