बिग बॉस मराठीच्या घरामधून नीथा शेट्टी साळवी घराबाहेर पडली आणि बिग बॉस मराठी सिझन ३ ला मिळाले या पर्वाचे टॉप १० सदस्य. आता इथून पुढे टास्क, आणि सदस्यांचा घरामधील प्रवास अधिक कठीण होणार यात शंका नाही. आता बिग बॉसच्या घरावर एलियन्सचा कब्जा होणार आहे त्यामुळे घरातील सर्व सदस्य बिग बॉस च्या आदेशानुसार लिव्हिंग एरियात एकत्र जमले.
असं असलं तरी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रूसवे फुगवे हे सुरूच असतात. विशाल आणि मीनलचा अबोला काही संपायचं नाव घेत नाहीये. टास्कनंतर झालेल्या बाचाबाचीमध्ये मीनल विशाल कानाखाली मारेन, मला हात नाही घाण करायचे असे बरेच काही बोलून गेली आणि तेव्हापासून दोघांमध्ये हा अबोला सुरू झाला. नंतर विकास आणि सोनालीने विशालला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ही सगळी चर्चा सुरू असताना मीनलला रडू कोसळले.