'तुझे हे प्रेम नाही, फक्त वासना आहे' असा आरोप कोणत्याही पुरुषाने एखाद्या स्त्रीवर करताना फारच कमी वेळा ऐकिवात आले आहे. परंतु हे वाक्य बोलला ‘बिग बॉस ओटीटी’ चा सदस्य प्रतिक सहजपल, त्याची सह सदस्य आणि घरातील त्याचे सध्याचे कनेक्शन नेहा भसीनला. बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियॅलिटी शो आहे. हिंदी बिग बॉसचे आज पर्यंत १४ हंगाम झाले आहेत. यावर्षी ‘बिग बॉस’ हा ओटीटी वर सुरु झाला असून त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. या पहिल्या ओटीटी पर्वाचे होस्टिंग करण जोहर करीत आहे.
अवघ्या तीन आठवड्यांमध्ये 'बिग बॉस ओटीटी' वादविवाद, ड्रामा व रोमांसच्या संदर्भात ओव्हर दि टॉप ठरला आहे. वर्षानुवर्षे अनेक नाती 'बिग बॉस' घरामध्ये बहरली आहेत आणि हा सीझन देखील त्यासंदर्भात अपवाद नाही. राकेश बापट व शमिता शेट्टी यांचा गोडवा चाहत्यांना आवडला असला तरी आणखी एक कनेक्शन प्रकाशझोतात येत आहे, ते म्हणजे नेहा भसिन व प्रतिक सहजपल.
मागील आठवड्यामध्ये प्रतिकने अक्षरा सिंगसोबतचे कनेक्शन तोडून नेहासोबत नवीन कनेक्शन सुरू केले. शोमध्ये दोघेही जिवलग मित्र बनले आहेत. पण या गायिकेला, म्हणजेच नेहा भसीनला, संगीतकार समीर उद्दीनसोबतच्या विवाहाबाबत कोणतीच चिंता नाही असे वाटतेय.