महाराष्ट्र

maharashtra

2020 मध्ये ट्विटरवर दिशा पटानी, प्रियंका चोप्रा जोनस आणि दीपिका पादुकोणचेच अधिराज्य

By

Published : Jan 15, 2020, 8:07 PM IST

2020च्या सुरूवातीला बॉलीवूडच्या तीन अभिनेत्रींची ट्विटरवरची लोकप्रियता सध्या चर्चेचा विषय आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्यानूसार, गेल्या काही दिवसांमध्ये ट्विटरवर दिशा पटानी, प्रियंका चोप्रा जोनस आणि दीपिका पादुकोणचेच अधिराज्य असलेले दिसून येत आहे.

Disha , Priyanka and Deepika
दिशा पाटनी, प्रियंका चोप्रा जोनस आणि दीपिका


स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आकडेवारीनूसार, दिशा पटानी ट्विटरवर सर्वाधिक प्रसिध्द असलेली अभिनेत्री असून लोकप्रियतेमध्ये तिने बॉलीवूडमध्ये तिच्याहून सीनियर असलेल्या प्रियंका चोप्रा-जोनास आणि दीपिका पादुकोण या आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे.

लोकप्रियतेत पहिल्यांदाच दिशाने प्रियंका आणि दीपिकाला टक्कर देत 100 गुणांसह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर ट्विटरवरच्या लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये नंबर वन स्थान पटकावलंय. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

दिशाच्या मलंग सिनेमाच्या फस्ट लूकमूळे युवावर्गाचे ध्यान तिने आकर्षित करून घेतले. 2020च्या सुरूवातीलाच ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय बनलेल्या या अभिनेत्रीच्या आकर्षक शरीरयष्टीमूळेही दिशा युथमध्ये सध्या चांगलीच प्रसिध्द आहे.

दूस-या स्थानी असलेली ग्लोबल आइकॉन प्रियंका चोप्रा जोनस तर सध्या जगप्रसिध्द असल्याने जगभरातून तिला ट्विटरवर फॅनफॉलोविंग लाभलेली आहे. त्यामूळेच 98 गुणांसह प्रियंका चोप्रा जोनस ट्विटरवर लोकप्रिय असलेली दूसरी अभिनेत्री बनलीय.

सामाजिक संदेश असलेल्या छपाक चित्रपटामूळे दीपिका गेले काही दिवस ट्विटरवर चर्चेत दिसून येत होती. 84 गुणांसह दीपिकाने लोकप्रियतेत तिसरे स्थान पटकावले आहे.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “ युवावर्गात अभिनेत्री दिशा पाटनीची सध्या चांगलीच लोकप्रियता आहे. ट्विटरवर तिच्या प्रत्येक पोस्टवर तरूणवर्गाची प्रतिक्रिया आणि पेजवरची एंगेजमेंट पाहून तिच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येतो. प्रियंका चोप्राच्या ट्विटर पेजवर ग्लोबली एंगेजमेंट दिसून आलीय. प्रियंका-नीकच्या फोटोला त्यांच्या चाहत्यांची जास्त एंगेजमेंट दिसून आलीय. छपाक चित्रपटाचे प्रमोशन, जेएनयुच्या मीटिंगला दीपिकाची उपस्थिती आणि छपाकमध्ये दिसलेला दीपिकाचा चांगला परफॉर्मन्स ह्यासर्वाचा एकत्रित परिणाम तिच्या ट्विटर पेजवरची एंगेजमेंट वाढण्यात झालाय.“

अश्वनी कौल पूढे सांगतात , "आम्ही मीडिया विश्लेषणासाठी 14 भाषांमध्ये 600 पेक्षा जास्त बातम्यांमधून डेटा संग्रहित करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, प्रिंट प्रकाशन, सोशल मीडिया, व्हायरल न्यूज, प्रकाशने आणि डिजिटल प्लेटफॉर्म समाविष्ट आहेत. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

ABOUT THE AUTHOR

...view details