जागतिक तापमानवाढीचे गंभीर परिणाम दर्शवणा-या आणि सर्व व्यक्तींन धोक्याचा इशारा देणारे प्रश्न विचारणा-या डिस्कव्हरी नेटवर्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रोचक क्रिएटिव्हजचे अभियान #StopTheMelt ला पाठबळ मिळाले आहे. समाजातील प्रभावशाली व्यक्तिमत्वे जसे मनोज बाजपेयी, दिया मिर्झा, प्रतिक गांधी, नीरज पांडे (चित्रपट निर्माते), सानिया मिर्झा आणि पर्यावरण विशेषज्ञ इव्हान कार्टर, निजेल मार्वन व इतर अनेक जण पर्यावरणाला वाचवण्याच्या व आपल्या सवयींबद्दल नव्याने विचारमंथन करणा-या ह्या उद्दिष्टामध्ये सहभाग देण्यासाठी पुढे आले आहेत.
डिस्कव्हरी चॅनेलने युएन इंडिया आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियासोबतच्या भागीदारीमध्ये #StopTheMelt ह्या पर्यावरणपूरक अभियानाच्या शुभारंभाची घोषणा केली आहे. ह्या वर्षीच्या युएन जागतिक पर्यावरण दिनाचा परिदृश्य विषय पर्यावरणीय व्यवस्थेचे पुनरुज्जीवन हा आहे अणि त्यासंदर्भात डिस्कव्हरी इंडियाचे उद्दिष्ट पृथ्वीच्या दयनीय स्थितीवर प्रकाश टाकणे, हे आहे. इतकी मोठी समस्या ही फक्त नाट्यमय कृतीद्वारेच अधोरेखित करता येऊ शकते आणि म्हणून ह्या जागतिक पर्यावरण दिवशी, पहिल्यांदाच डिस्कव्हरी इंडिया आपल्या लोगोमध्ये बदल करून जागतिक तापमानवाढीच्या परिणामांच्या आकलनाला चालना देणार आहे.
या अभियानाबद्दल बोलताना, साउथ- एशिया डिस्कव्हरी इन्कच्या मॅनेजिंग डायरेक्टर मेघा टाटा, ह्यांनी सांगितले की, “पर्यवरणावर होणा-या मानवी परिणामाला कमी करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता वाढवण्याची आमची कटिबद्धता आम्ही पुढे नेत आहोत. युएन इंडीया आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया ह्या दोन अतिशय सशक्त व पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सातत्याने कार्यरत असलेल्या दलांसोबत पार्टनरशिप करताना आम्हांला आनंद होत आहे. रिअल लाईफ मनोरंजन क्षेत्रातील नेतृत्व म्हणून नेहमीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुद्द्यांकडे लक्ष आकर्षित करणे आणि अधिक चांगल्या भविष्याच्या दिशेने कार्यरत राहणे, ही आमचीसुद्धा जवाबदारी आहे.”