मास्टर दीनानाथ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यात सलिम खान यांना जीवन गौरव पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे. तसेच वीर मरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करणाऱ्या भारत के वीर संस्थेला १ कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे. मोहन भागवत यांच्या हस्ते दिनानाथ मंगेशकर पुरस्काराचे वितरण होणार आहे.
मास्टर दीनानाथ पुरस्कारांची घोषणा, भारत के वीर संस्थेला १ कोटींची मदत
मास्टर दीनानाथ पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार लेखक सलिम खान यांना जाहीर झालाय. वीरमरण आलेल्या कुटुंबियांसाठी १ कोटी रुपये देण्याचा संकल्प करण्यात आलाय. मोहन भागवतांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल.
संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर कुटुंबिय आणि मास्टर दीनानाथ पुरस्कार समितीच्या सदस्यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.
यंदाच्या पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणे आहेत
1) संगीत- सुचेता ताई भिडे चाफेकर
2) जीवन गौरव - सलिम खान, लेखक
3) सिनेमा - मधुर भांडारकर
4) ( outstanding contribution in cinema) - हेलनजी
5)वागविलसिनी ( साहित्य) - वसंत आबाजी ढहाके
6) मोहन वाघ पुरस्कार - मराठी नाटक ( भद्रकाली प्रोडक्शन - सोयरे सकळ )
7) विशेष पुरस्कार - भारत के वीर संस्थेला दिला जाईल. सीआरपीएफ अधिकारी स्वीकारणार पुरस्कार
1 कोटी रुपयांचा हा विशेष पुरस्कार असेल.