मुंबई - अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि दलजीत दोसांझ यांचा कॉमेडी 'अर्जून पटियाला' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने क्रिती आणि दलजीत पहिल्यांदाच एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात दलजीत दोसांझ हा पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर, क्रिती ही पत्रकाराच्या रुपात पाहायला मिळणार आहे.
क्रिती - दलजीत दोसांझच्या 'अर्जुन पटियाला'चा ट्रेलर प्रदर्शित - surma
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये क्रिती, दलजीत आणि वरूण शर्मा यांची धमाल कॉमेडी पाहायला मिळतेय.

या चित्रपटाचे नवे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहेत. रोहित जुगराज हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये क्रिती, दलजीत आणि वरूण शर्मा यांची धमाल कॉमेडी पाहायला मिळतेय. दलजीत या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक रोहित जुगराजसोबत तिसऱ्यांदा काम करत आहे. यापूर्वी त्याने त्यांच्यासोबत 'सरदारजी' आणि 'सरदारजी -२' या चित्रपटात काम केले आहे.
दलजीत दोसांझचा 'सुरमां' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गाजला होता. तर, क्रिती सेनॉन अलिकडेच कार्तिक आर्यनसोबत लूका-छुपी चित्रपटात झळकली. आता क्रिती आणि दलजीतच्या जोडीला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हा चित्रपट २६ जुलैला प्रदर्शित होणार आहे.