मुंबई- अभिनेत्री दीया मिर्झा आणि तिचा पती वैभव रेखी हनिमुनसाठी मालदिवमध्ये दाखल झाले आहेत. सुट्टीतील काही खास क्षणांचे फोटो दीयाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोत दीया आणि वैभवसोबत तिची सावत्र मुलगी समाइरा रेखीदेखील दिसत आहेत.
रविवारी रात्री दीया मिर्झाने लग्नानंतरचा पतीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. यातील अनेक फोटोंच्या मालिकेमध्ये दीयाने सावत्र लेक समाइरा रेखीचा हात धरलेला दिसत आहे.
“आम्ही मालदीवमध्ये काही खास आठवणी जमा केल्या.🐬☀️🌏,” असे दीयाने फोटोंच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय. तिच्या या फोटोवर बिपाशा बासू, मसाबा गुप्ता आणि इतर अनेक नामांकित व्यक्तींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
समाइरा ही वैभव रेखीची पहिली पत्नी सुनयना रेखीची मुलगी आहे. दीया आणि वैभवच्या लग्नात समाइरा हजर होती. या लग्नाची ती साक्षीदार झाल्याचा आनंद सुनयना रेखीने व्यक्त केला होता. विशेष म्हणजे या लग्नात महिला पुजारीने सर्व लग्नाचे विधी पार पाडले होते.
हेही वाचा - आमिर खान सर्वांना समानतेची वागणूक देतो - एली अवराम