महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘डान्स दिवाने ३’ मध्ये दिसणार धर्मेश ‘सर’! - धर्मेश सर लेटेस्ट न्यूज

कलर्स वाहिनीवर पुन्हा एकदा नर्तकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि सर्व पिढ्यांची डान्स करण्याची भावना साजरी करण्यासाठी ‘डान्स दिवाने’ चा मंच आता नव्या पर्वासह पुन्हा येत आहे. या रियालिटी शोची दोन पर्वे झालेली असून आता तिसरे पर्व येणार आहे.

dharmesh joins with madhuri dixit as judge in dance deewane season three
‘डान्स दिवाने ३’ मध्ये माधुरीसोबत परीक्षक म्हणून सामील होणार धर्मेश ‘सर’!

By

Published : Jan 17, 2021, 3:46 PM IST

मुंबई - कोरोनाचे संकट संपुष्टात येत असताना मनोरंजनसृष्टी जोमाने कामाला लागली आहे. गेल्या वर्षीअनेकजण विविध मार्गांनी जीवनात सकारात्मकता फुंकण्याचा प्रयत्न करीत होते. बऱ्याच जणांना नृत्यामुळे नवसंजीवनी मिळाल्यासारखे वाटत होते. अशातच ज्यांना नृत्याची खूप आवड आहे आणि त्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवावेसे वाटत असेल तर त्यांच्यासाठी एक मोठा डान्स रियालिटी शो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतण्याची तयारी करत आहे.

कलर्स वाहिनीवर पुन्हा एकदा नर्तकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि सर्व पिढ्यांची डान्स करण्याची भावना साजरी करण्यासाठी ‘डान्स दिवाने’ चा मंच आता नव्या पर्वासह पुन्हा येत आहे. या रियालिटी शोची दोन पर्वे झालेली असून आता तिसरे पर्व येणार आहे. गेल्या दोन पर्वांत माधुरी दीक्षित, तुषार कालिया आणि शशांक खेतान यांनी जज म्हणून काम पहिले. परंतु ‘डान्स दिवाने’ च्या तिसऱ्या पर्वात शशांक खेतान नसणार आहे. ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित आणि कोरियोग्राफर तुषार कालिया यांच्यासोबत धर्मेश येलांडे म्हणजेच सर्वांचे लाडके धर्मेश ‘सर’ परीक्षक पॅनेलवर सामील होणार आहे. तिघेही स्पर्धकांना नृत्याचा स्तर उंचाविण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.

‘डान्स दीवाने’चा आगामी सीझन पुन्हा एकदा स्वप्नांच्या शक्तीचे पुनरुत्थान करणार आहे. कारण विविध वयोगटाचे डान्सर एकत्र येणार आहेत, जे जोडीने, तिकडीने आणि गटात डान्स करून परीक्षकांच्या हृदयात जागा बनविण्याचा प्रयत्न करतील.

हेही वाचा - सेहवागने एका शब्दात केले टीम इंडियाच्या साहसाचे कौतुक

ABOUT THE AUTHOR

...view details