महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कष्टाचे दिवस आठवून भावूक झाले धर्मेंद्र - भावूक झाले धर्मेंद्र

सिंगिंग रिअ‌ॅलिटी शो इंडियन ऑयडॉलच्या मंचावर अभिनेता धर्मेंद्र पाहुणे म्हणून आले होते. यावेळी आपल्या कष्टाच्या दिवसांची त्यांना आठवण झाली आणि ते भावूक झाले.

Dharmendra remembers old days
भावूक झाले धर्मेंद्र

By

Published : Feb 8, 2020, 4:50 PM IST

Updated : Feb 8, 2020, 4:56 PM IST


मुंबई - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आजच्या नव्या पिढीतही खूप लोकप्रिय आहेत. सिंगिंग रिअ‌ॅलिटी शो इंडियन ऑयडॉलच्या मंचावर आलेल्या धर्मेंद्र यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

धर्मेंद्र म्हणाले, ''सुरुवातीच्या काळात मी एका गॅरेजमध्ये राहात होता, कारण मुंबईत राहण्यासाठी माझ्याकडे जागा नव्हती. मुंबईत गुजारा करण्यासाठी मी ड्रिलींग फर्ममध्ये काम करीत होतो, त्याचे मला २०० रुपये मिळायचे. अधिक पैसे मिळण्यासाठी मी जादा काम करायचो.''

इंडियन ऑयडॉलमधील एका स्पर्धकाने धर्मेंद्र यांच्या 'चरस' सिनेमातील 'कल की हसिन मुलाकात के लिए' हे गाणे सादर केल्यानंतर धर्मेंद्र यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

मूळचे पंजाब राज्याचे असणारे धर्मेंद्र ७० आणि ८० च्या दशकात आघाडीचे अभिनेते होते. एक धाडसी अभिनेता म्हणून त्यांचा लौकिक होता. असंख्य हिट चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.

Last Updated : Feb 8, 2020, 4:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details