महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

...तर मी सनीला निवडणूक लढवण्यापासून अडवले असते - धर्मेंद्र - losabha election

बॉलिवूड अभिनेता सनी देओल याने अलिकडेच राजकारणात प्रवेश घेतला आहे. पंजाबच्या गुरूदासपूर मतदारसंघातून तो भाजपकडून निवडणूक लढवत आहे. मात्र, एका कारणामुळे मी सनीला ही निवडणूक लढवण्यापासून अडवले असते, असे धर्मेंद्र यांनी म्हटले आहे.

...तर मी सनीला निवडणूक लढवण्यापासून अडवले असते - धर्मेंद्र

By

Published : May 13, 2019, 12:53 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता सनी देओल याने अलिकडेच राजकारणात प्रवेश घेतला आहे. पंजाबच्या गुरूदासपूर मतदारसंघातून तो भाजपकडून निवडणूक लढवत आहे. निवडणूकीच्या प्रचारकाळात त्याचा जोरदार प्रचारही सुरू आहे. मात्र, एका कारणामुळे मी सनीला ही निवडणूक लढवण्यापासून अडवले असते, असे धर्मेंद्र यांनी म्हटले आहे.

होय, धर्मेंद्र यांचे घनिष्ठ मित्र बलराम जाखड यांचा मुलगा सुनिल जाखड हा देखील गुरूदासपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. जर हे आधीच मला माहीत असते, तर मी सनीला ही निवडणूक लढवण्यापासून थांबवले असते, असे धर्मेंद्र यांनी सांगितले आहे. त्यांना गुरूदासपूरमध्ये आल्यानंतर ही गोष्ट समजली होती.

बलराम यांच्यासोबत असलेल्या मैत्रीबद्दल बोलताना ते म्हणाले, की 'मी राजकारणात प्रवेश घेतला होता तेव्हा मला यामधले फारसे ज्ञान अवगत नव्हते. त्यावेळी बलराम यांनीच मला मदत केली होती. त्यांच्या निवडणूक प्रचारातही मी सहभागी झालो होतो. त्यांचा मुलगा सुनिल हा देखील मला माझ्या मुलाप्रमाणेच आहे. मात्र, आता काहीही बदलू शकत नाही. आमच्या पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही पूर्ण करणार आहोत'. तसेच, नागरिकांना दिलेली आश्वासने देखील पूर्ण करणार असल्याचे धर्मेंद्र यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details